ashta news : जनता निष्ठावंतांच्या पाठीशी : वैभव शिंदे : आष्टा शहरातील कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता ही आ.जयंतराव पाटील व स्व. विलासराव शिंदे यांच्याशी एकनिष्ठ, निष्ठावंत संयमी उमेदवारांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी केले.
ashta news : जनता निष्ठावंतांच्या पाठीशी : वैभव शिंदे
ते प्रभाग क्र.आठ मधील राजाराम बाळू पाटील, सारिका अंकुश मदने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे, नगरसेवक पदाचे उमेदवार राजाराम पाटील, सारिका मदने यांच्यासह अंकुश मदने, अशोक मदने, नितीन शिंदे, उदय मोटकट्टे, महादेव चव्हाण, सचिन शिरतोडे, आदर्श घळगे, किरण माने, सुभाष मोटकट्टे, विजय कटारे, दिपक जाधव, हणमंत शिंदे, मुबारक कावणकर, अमित मुजावर, विष्णू मोरे, बिरू येडगे व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
वैभव शिंदे म्हणाले, या प्रभागाचा स्व.माजी आमदार विलासराव शिंदे, आ. जयंतराव पाटील व त्यांच्या शिलेदारांनी मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. या भागात विविध समाजाची घरकुले, समाज मंदिरे, रस्ते, सांडपाणी, दिवा बत्ती आदी विकासकामे केली आहेत. या प्रभागातील सर्व समाजबांधव शहर विकास आघाडीच्या पाठीशी असून, काहीजण नवखे दारात येऊन नमस्कार घालून मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करून वेगवेगळी आश्वासनं देऊ पाहत आहेत.
त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आष्टा शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे शांत, सयंमी, निष्कलंक उमेदवार विशाल शिंदे, राजाराम पाटील, सारिका मदने यांना शिट्टी या चिन्हसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्या.
फोटो ओळी : आष्टा येथे शहर विकास आघाडीच्या प्रचारप्रसंगी राजाराम पाटील, सारिका मदने, अंकुश मदने, अशोक मदने व पदाधिकारी, कार्यकर्ते
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











