dudhgaon news : “साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव रचला होता. ; राजू शेट्टी 

SHARE:

dudhgaon news : “साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव रचला होता. ; राजू शेट्टी  : “साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव रचला होता. पण तुमच्या पाठबळावर मी तो डाव उधळला. त्यामुळे ३५०० दर देणं कारखानदारांना भाग पडलं.

dudhgaon news : “साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव रचला होता. ; राजू शेट्टी 

शेतकऱ्याच्या हक्कासाठी पुढेही मी तितक्याच जोरात उभा राहणार. आता तुम्हीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना बळ द्या आणि येणाऱ्या निवडणुकांत संघटना मजबूत करा.” शेट्टी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले—

दुधगावमध्ये आज विकासकामांचा धडाका उडाला. मा. खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले. गावात मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी २५ लाखांचा भरीव निधी शेट्टी यांनी आधीच मंजूर केला होता, त्याचीच आज प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली.

उसाला ३५०० रुपये दर मिळवून दिल्याबद्दल दुधगाव ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने राजू शेट्टींचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलताना शेट्टी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले—

कार्यक्रमाला दुधगाव सरपंच करिष्मा पाखरे, उपसरपंच अविनाश भोसले, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील, प्रवीण कोळी, सुरेखा माळी, सुरेखा मेत्रे, माणिक कुंभार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय बेले, संदीप राजोबा, महेश कराडे, जगन्नाथ भोसले, बाबा साद्रे, भरत साजणे, मयूर पाटील, सुभाष पाटील, अमोल कोले, पोपट कोले यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमोल कुदळे, दुधगाव
Author: अमोल कुदळे, दुधगाव

अमोल कुदळे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. तरुण भारत मध्ये तें सध्या असून राजकीय लाईव्ह साठीही लिखाण करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *