manerajuri news : मणेराजुरीतील वेश्या अड्डा उद्धवस्त डॉल्फिन हॉटेलवर पोलिसांचा छापा : चौघांविरोधात गुन्हा दाखल : दोन मुलींची सुटका तालुक्यातील मणेराजुरी येथील डॉल्फिन हॉटेलवर गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय तेजीत सुरू होता. याबाबत माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी या हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी दोन मुली व दोन गिर्हाईक त्याठिकाणी सापडले. याप्रकरणी दोन्ही गिर्हाईक व हॉटेल मालक, मॅनेजर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलवर सापडलेल्या मुलींची पोलिसांनी सुटका केली. हा वेश्या अड्डा उध्वस्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
manerajuri news : मणेराजुरीतील वेश्या अड्डा उद्धवस्त डॉल्फिन हॉटेलवर पोलिसांचा छापा : चौघांविरोधात गुन्हा दाखल : दोन मुलींची सुटका
याप्रकरणी हॉटेल मालक कैलास बाबासो सूर्यवंशी (वय 27, रा. जाधववाडी, ता. कवठेमहांकाळ), मॅनेजर सागर पोपट भोसले (वय 23, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) यांच्यासह दोन गिर्हाईकांवर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी मणेराजुरी येथील कोड्याच्या माळावर असणार्या डॉल्फिन हॉटेलवर मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू होता. परराज्यातून अनेक मुली जबरदस्तीने या व्यवसायासाठी आणल्या जात होत्या. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक युवक या हॉटेलवरील वेश्यांच्या जाळ्यात अडकले होते. 4 ते 5 मुली या हॉटेलवर नेहमी असायच्या.
हॉटेलचा मॅनेजर तसेच अन्य काहीजण या मुलींचे फोटो स्टेटस ठेवत होते. ’न्यू स्टॉक अव्हेलेबल’ असे मेसेज झळकत होते. त्यांचे रेटकार्डही टाकले जात होते. हे फोटो पाहून गिर्हाईक आकर्षित होत होते. हॉटेलमधील एका रूमवर या मुली ठेवल्या जात होत्या. गिर्हाईक या हॉटेलवर आल्यानंतर मॅनेजर या मुली त्यांना दाखवत होता. त्यातून पसंती झाल्यानंतर गिर्हाईक व त्या मुलीला एका रूमवर पाठवले जात होते. दीड ते दोन हजार रुपये एका गिर्हाईकाकडून उकळले जात होते. त्यातील अवघे 500 रुपये संबंधित मुलीला दिले जात होते.
अलीकडील काही दिवसात हा धंदा तेजीत सुरू होता. हॉटेववरील मुली दर आठ – दहा दिवसाला बदलल्या जात होत्या. हजारोंचा धंदा दररोज होत होता. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश भोसले यांना या हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असून काही मुली जबरदस्तीने या व्यवसायात आणल्याची माहिती मिळाली. त्यांनतर पोलीस निरीक्षक संग्राम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी, अमित परीट, गीतांजली पाटील, सतीश साठे, अजित सूर्यवंशी, तानाजी शिंदे, आरती खोत यांचे पथक करण्यात आले.
सोमवारी दुपारी हे पथक छापा टाकण्यासाठी हॉटेलवर पाठवण्यात आले. हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी त्याठिकाणी सुनील चव्हाण व ओंकार सकटे ही दोन गिर्हाईक सापडले. तर वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन मुलीही सापडल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दोन्ही गिर्हाईकांसह हॉटेल मालक कैलास सूर्यवंशी व मॅनेजर सागर भोसले या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











