kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळ भरधाव दुचाकीची घोड्याला धडक, वृद्धाचा मृत्य

SHARE:

kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळ भरधाव दुचाकीची घोड्याला धडक, वृद्धाचा मृत्य : पेठ ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील कसबेडिग्रज गावाजवळ मध्यरात्री भरधाव दुचाकीने अचानक रस्त्यावर आलेल्या घोड्याला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग ज्योती शिंदे (वय 79 रा. मिरज) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गणपती गोपाळ मंडले (वय 68 रा. मिरज) हे गंभीर जखमी झाले. सदरचा अपघात हा रविवार दि. 09 नोव्हेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला.

kasbe digraj news : कसबे डिग्रजजवळ भरधाव दुचाकीची घोड्याला धडक, वृद्धाचा मृत्य

या प्रकरणी मृत शिंदे यांचे नातू ऋत्विक विजय जाधव (वय 23 रा. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी चालविणार्‍या गणपती मंडले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत पांडुरंग शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह मिरजेतील रेणुका मंदिर जवळ राहतात. रविवार दि. 09 नोव्हेंबर रोजी शिंदे हे मंडले यांच्या दुचाकी (क्र. एमएच 10 एजे 7488) वरून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेकडे जात होते. कसबेडिग्रज गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंप समोर आले असता रस्त्यावर अचानक एक घोडा आला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने या घोड्याला जोराची धडक दिली.

या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्तव झाला तर चालक मंडले हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिरजेतील एका खाजगी रुग्णालयात शिंदे यांच्यावर उपचार सुरु असताना सोमवार दि. 24 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शिंदे यांचे नातू ऋत्विक जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी निष्काळजीपणाने, घोड्याकडे दुर्लक्ष करून अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालक मंडले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *