आष्टा नगरपालिकेची कथा ही फक्त कागदोपत्री प्रशासनाची नाही…
ती आहे संघर्षाची, ती आहे तुटपुंज्या साधनसंपत्तीची,
आणि ती आहे एक संकल्पाची—
शहर उभं राहील, ताठ उभं राहील, आणि स्वतःच्या बळावर विकास करेल!
ashta shopping centar : “आष्ट्याच्या अर्थव्यवस्थेला नवा आधार… विकासाला नवा विस्तार!”
आष्टा नगरपालिकेची
नगरपालिकेचे उत्पन्न…
घरपडी, पाणीपट्टी, आणि काही किरकोळ शुल्क.
वार्षिक फक्त एक कोटींच्या आसपासचं उत्पन्न!
आणि खर्च?
लाईट बिल, कामगारांचे पगार, दैनंदिन प्रशासन…
हे सर्व वजा झाले की,
विकासकामांसाठी उरायचं ते फक्त ‘शून्या’चं स्वप्न.
पण शहराची प्रगती शून्याने कधी होते का?
स्वप्नं पूर्ण होतात जेव्हा नेतृत्व धाडस दाखवतं… दृष्टी दाखवतं…
आणि मग पुढे आले— मा. विलासराव शिंदे साहेब!
त्यांनी स्पष्ट जाणलं…
“फक्त करातून मिळणारं उत्पन्न हे शहराला मोठं उभं करण्यासाठी पुरेसं नाही.
नव्या उत्पन्नाच्या स्रोतांची निर्मिती ही काळाची गरज आहे!”
आणि या विचारातून जन्माला आली—
आष्टा शहरात शॉपिंग सेंटर बांधण्याची दूरदृष्टीची योजना!
नगरपरिषदेकडे जमीन होती…
आणि त्या जागेवर ९०% बाटा-वित (B.O.T) पद्धतीने
भव्य शॉपिंग सेंटर उभं राहिलं.
शहराच्या प्रवेशद्वाराजवळ, ३६ गावांच्या पाठीवर रोज बाजार जमतो त्या ठिकाणी!
मोठ्या शहरांसारखं व्यापारी केंद्र…
लहान दुकानदार, छोटे उद्योजक, महिला बचतगट, आणि तरुण व्यावसायिकांसाठी
आर्थिक संधींचं सुवर्णद्वार उघडलं.
आज—
कासार मळा, शिंदे मार्केट, बाजारवाडी, मिरजवेस, गांधी नगर,
मतदार मंडळ, दत्तमंदिर चौक या सर्व भागांतून
दुकानधारक येऊन बसले, व्यवसाय उभारले, स्थिर झाले!
या शॉपिंग सेंटरमधून नगरपालिकेला
वर्षाकाठी 20 ते 25 लाख रुपयांचे नियमित उत्पन्न मिळू लागले.
हाच तो बदल…
जिथे आधी प्रत्येक रुपया मोजावा लागत होता,
तिथे आता नगरपालिकेला दरवर्षी मिळणाऱ्या या उत्पन्नाने
शहराच्या विकासाला नवे पंख मिळाले.
ही फक्त इमारत नव्हे… हा आहे निर्णय!
– दूरदृष्टीने घेतलेला
– शहराच्या भविष्यासाठी केलेला
– आणि लोकांच्या हितासाठी साकारलेला!
आष्ट्याच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणारा,
लहान व्यापाऱ्यांना नवा आधार देणारा,
आणि नगरपालिकेला स्वावलंबी बनवणारा हा उपक्रम
आजही शहरातील प्रगतीची ओळख ठरला आहे.
शहर बदलायला पैसा नव्हे… नेता बदलतो!
आणि विलासराव शिंदे साहेबांनी ती शक्ती सिद्ध केली!
पुढची वाटचाल : विशाल शिंदे यांचा नवा अध्याय 
आज आष्टा नगरपालिकेच्या राजकारणात एक नवीन सूर्य उगवतो आहे.
विलासराव शिंदे यांच्या कर्तृत्वाचा तेजस्वी वारसा हातात घेत,
विशाल शिंदे आता थेट नगराध्यक्ष पदाच्या दिशेने निर्णायक पावलं टाकत आहेत.
त्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत—
आष्ट्याला आधुनिकतेच्या दिशेने नेण्याची,
विकासाच्या प्रकाशाने प्रत्येक गल्ली उजळण्याची,
आणि सर्वसामान्य माणसाच्या आंगणात आशेची नवचैतन्य घेऊन जाण्याची।
त्यांची वाटचाल ही केवळ राजकीय धाव नाही—
ती एक सेवेची शपथ,
एक नात्यांची उब,
आणि आष्ट्याला उंच शिखरावर नेण्याची अढळ जिद्द आहे.
विशाल शिंदे उभे राहिले आहेत आदर्श, दृष्टिकोन आणि ध्येयधोरणासाठी.
आणि म्हणूनच आज आष्ट्याची जनता केवळ उमेदवार पाहत नाही—
तर पाहते आहे एक आश्वासक नेतृत्व,
एक युवक शक्तीचे प्रतीक,
आणि आष्टा बदलण्याची प्रामाणिक इच्छा असलेला एक नवा नगराध्यक्ष.
आता त्यांची वाटचाल फक्त सुरू झाली आहे…
विलासरावांच्या विचारांच्या प्रकाशात
आणि जनतेच्या आशीर्वादाच्या शक्तीतून
ही वाटचाल आष्ट्याच्या विकासाची सुवर्णकथा लिहिणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.







आष्टा शहरात शॉपिंग सेंटर बांधण्याची दूरदृष्टीची योजना!
ही फक्त इमारत नव्हे… हा आहे निर्णय!





