kurandwad murdar news : सासर्‍याने निवडणूक खर्चासाठी 10 लाख मागितले कुरूंदवाडमध्ये विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक

SHARE:

kurandwad murdar news : सासर्‍याने निवडणूक खर्चासाठी 10 लाख मागितले कुरूंदवाडमध्ये विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक :  सासर्‍याच्या निवडणूक खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीच्या तगाद्यामुळेच विवाहितेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यावरून कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय 31) व जाऊ समिना इलहान गरगरे (वय 28, दोघेही रा. कुरुंदवाड) या दोघा आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील सासू मुमताज गरगरे व सासरा राजमहंमद गरगरे यांना अटक झाली नव्हती.

kurandwad murdar news : सासर्‍याने निवडणूक खर्चासाठी 10 लाख मागितले कुरूंदवाडमध्ये विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक

कौसर गरगरे हिने गुरुवारी (दि. 20) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सुरुवातीला टीईटीचा अभ्यास होत नसल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याचे वर्दीमध्ये नोंदविण्यात आले होते. मात्र, कौसर हिच्या माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केल्याने दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. यावेळी घातपाताच्या संशयावरून मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका माहेरकडील लोकांनी घेतली होती.

दरम्यान, मृताचा भाऊ अलताफ आवटी (रा. जयसिंगपूर) याने पतीसह सासू, सासरा व जावेविरूद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. पतीच्या व्यवसायाकरिता व सासर्‍याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशा मागणीचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून कौसरने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *