bailgada shairat : बोरगावमध्ये बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार

SHARE:

कुस्तीचं जंगी मैदान गाजवणार्‍या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी bailgada shairat : बोरगावमध्ये बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार : बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेतून लक्ष वेधलं आहे. कारण, चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात भरविण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत बक्षिसांचा धुरळा उडाला आहे. रविवार 9 नोव्हेंबर रोजी तासगावजवळ भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या बैलगाडा शर्यत स्पर्धेतील विजेत्या गाडामालकांसाठी 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी अशी भुवया उंचावणारी बक्षिसे आहेत.

bailgada shairat : बोरगावमध्ये बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार

शिवसेना ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या चंद्रहार पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा धुरळा उडवून दिला आहे.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा एकदा भव्य बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडवणार आहेत. येत्या 9 नोव्हेंबरला तासगावजवळ भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात येत आहे. या बैलगाडी शर्यतीसाठी 2 फॉर्च्यूनर कार, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी गाड्यांची बक्षीसे स्वरूपात ठेवण्यात आल्याने ही स्पर्धा लक्षवेधी ठरत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रातील हे पहिलं बैलगाडा शर्यत संघटनेचे अधिवेशन 9 नोव्हेंबर रोजी तासगावजवळ आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा आणि श्वान शर्यतीचे आयोजन केले आहे. यात तीन फेर्‍यांची जनरल बैलगाडा शर्यत आणि पट्टा पद्धतीची शर्यत घेतली जाणार असून या कार्यक्रमात राज्यभरातून 4 ते 5 लाख शेतकरी व गाडी मालक सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गोवंश व पशुसंवर्धनाचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या बैलगाडी शर्यतीत पहिल्या, दुसर्‍या क्रमांकासाठी चारचाकी वाहने तसेच 6 ते 7 ट्रॅक्टर्सचे बक्षीस आहे. तसेच, इतर उत्तेजनार्थ 150 दुचाकी बक्षीस स्वरूपात दिल्या जाणार आहे. ओपन जनरल स्पर्धेसाठीही चारचाकी गाड्या, ट्रॅक्टर आणि दुचाकी बक्षीसे दिले जाणार आहेत. त्यामुळे, राज्यात आत्तापर्यंतची सर्वाधिक बक्षीसे, सर्वात मोठे, महागडे बक्षीसे देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा जोर धरत आहेर होत चालले Aआहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *