zp election : जि.प.निवडणुकांची घोषणा दोन आठवड्यात होणार : जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा येत्या दोन आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 30 दिवसात या निवडणुका उरकल्या जाणार असल्याची चर्चा आहे. निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. प्रभाग आरक्षण अंतिम झाल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम नोव्हेंबरच्या तिसर्या आठवड्यात जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यात त्या पूर्ण करण्याबाबात निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु आहेत. आरक्षण प्रक्रियेविरोधात न्यायालयीन वाद सुरु असल्यामुळे आयोगाला न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
zp election : जि.प.निवडणुकांची घोषणा दोन आठवड्यात होणार
डिसेंबरअखेरपर्यंत जि.प.निवडणुका पूर्ण केल्या जाण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्यात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. याचा फटका हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बसण्याची भिती सत्ताधारी महायुतीला वाटत आहे. यामुळे जिल्हा परिषदा निवडणुका अप्रत्यक्षरित्या लांबणीवर पडल्या आहेत. तसेच आरक्षण प्रक्रियेविरोधातील न्यायालयीन वादाचे निवडणूक कार्यक्रमावर सावट देखील आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनासबरोबर निवडणुक आयोगाने आढावा घेतला. यामध्ये पहिल्या टप्यात राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर, दुसर्या टप्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सर्वात आधी होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण राज्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात शेतीची हानी झाली आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्वरीत झाल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आदींना शेतकरी वर्गाची नाराजी परवडणारी नाही. शेतकर्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ही मदत मिळण्यास काहीसा विलंब लागत आहे. यामुळे जिल्हा परिषदा निवडणुका डिसेंबरअखेर घेतल्यास त्याचा तेवढा परिणाम जाणवणार नाही, असे महायुतीचे धोरण आहे.
जानेवारीअखेर निवडणुका पार पाडाव्या लागणार
पहिल्या टप्यात, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका, दुसर्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि अखेरच्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे. आहे. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा राज्य निवडणूक आयोगाला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











