संजय पवार, भोसे
bhose news : भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात आशिष जाधव यांचे दमदार शक्तीप्रदर्शन संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक रणधुमाळीला चांगलाच वेग आला असून इच्छुकांच्या वाढत्या रांगेतही भाजपाकडून आशिष जाधव यांनी आपली उमेदवारी प्रभावीपणे अधोरेखित केली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातून आशिष जाधव आणि भोसे पंचायत समिती गणातून मनोज पाटील यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
bhose news : भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात आशिष जाधव यांचे दमदार शक्तीप्रदर्शन
माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आशिष जाधव गेल्या सहा महिन्यांपासून अक्षरशः भोसे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनतेशी थेट नातं निर्माण केलं आहे.
प्राथमिक शाळांना भरीव मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, खेळाडूंना मार्गदर्शन शिबिरे अशा उपक्रमांमुळे जाधव यांची प्रतिमा केवळ राजकीय नेत्याची न राहता समाजाभिमुख कार्यकर्त्याची ठसठशीत झाली आहे.
भोसे, सोनी यांच्यासह मतदारसंघातील सर्व 11 गावांमधील भाजप कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी मजबूत संघटन उभं केलं आहे. याच संघटन शक्तीचं दर्शन उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांची उस्फूर्त उपस्थिती आणि घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.
उद्योजक असलेल्या आशिष जाधव यांनी मतदारसंघात नव्या पिढीला राजकारणात सहभागी करून घेत नवयुवकांची भक्कम फळी उभी केली आहे. त्यामुळे युवकांमध्ये त्यांना मोठा आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून हा पाठिंबा निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी सकाळी तानंग येथील ग्रामदैवत श्री हनुमानाचे दर्शन घेऊन आशिष जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. यावेळी भोसे, करोली, तानंग कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी, मानमोडी, सोनी आदी गावांतील ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मजबूत संघटन पाहता भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात आशिष जाधव यांचा विजय जवळपास निश्चित असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











