bibtya news : देवराष्ट्रेत युवकावर बिबट्याचा हल्ला: देवराष्ट्रे येथील भरत साळुंखे हे शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये ऊस तोडत असताना शेताजवळच्या ओढ्याच्या काठावर असलेल्या झाडीतून हालचालीचा आवाज येऊ लागला म्हणून ते पुढे झाडीकडे गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला भरत यांनी चपळाईने हा हल्ला चुकवला याच वेळी भरत यांच्या बरोबर असलेल्या दोन पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ल्या केल्यामुळे बिबट्याने व एका पिल्लांने तेथून पलायन केले.
bibtya news : देवराष्ट्रेत युवकावर बिबट्याचा हल्ला
तीन पिल्लासह बिबट्याचे दर्शन : कुत्र्यांच्या प्रतिहल्ल्याने पलायन.
देवराष्ट्रे (ता. कडेगांव) येथील रामापूर रस्त्यावरील बोरीचा ओढा या परिसरात भरत साळुंखे यांचे शेत व घर आहे. घरासमोरील शेतामध्ये भरत साळुंखे ऊस तोडत होते. ऊस तोडत असताना शेताच्या जवळील ओढ्याच्या काठावरील झाडीतून हालचाली आवाज येऊ लागला म्हणून ते झाडीजवळ गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला परंतु भरत यांनी प्रसंग सावधानता राखत हा हल्ला चुकवला. यावेळी भरत यांच्या बरोबर त्यांनी पाळलेले रॉट व्हिलर व बेल्जियम शेफर्ड जातीची दोन कुत्री होती.
या दोन्ही कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला यामुळे बिबट्याने व त्याच्या एका पिल्लाने घटनेच्या ठिकाणावरून ऊसाच्या शेतातून पलायन केले परंतु बिबट्याची आणखी दोन पिल्ले ओढ्याच्या काठावरील झाडीमध्ये होती. दोन्ही कुत्री पिल्लांच्यादिशेने गेली असता भीतीने ही पिल्ली झाडावरती जाऊन बसली. झाडाखाली दोन कुत्री व माणसे जमा झाल्याने जवळपास अडीच – तीन तास बिबट्याची पिल्ले झाडावरतीच होती.
भरत साळुंखे यांनी सदर घटनेची माहिती, वनविभागाला कळवली यानंतर सागरेश्वर अभयारण्याचे वनक्षेत्रपालत बालाजी चव्हाण व कर्मचारी, कडेगांव प्रादेशिक वन विभागाचे वनपाल एस. एस. कुंभार, एस. टी. गवते, वनरक्षक रोहन मेक्षे, एम. एम. मुसळे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मादी बिबट्या पिल्लांसाठी माणसांवर हल्ला करू शकते या कारणास्तव घटनास्थळावरील लोकांना मागे सरकवत झाडावर अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लांना जाऊन दिले.
सुमारे अडीच – तीन तास चाललेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून सदर घटनेच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्यावर लक्ष ठेवले जात आहे. गावातील विविध परिसरामध्ये बर्याच बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे वारंवार लोकांच्या निदर्शनास येत आहे तरी अनपेक्षित दुर्घटना घडण्याआधी वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











