shaktipith news : शक्तिपीठचा नवा मार्ग सोलापूर, सांगलीतून जाणार : देवेंद्र फडणवीस

SHARE:

shaktipith news : शक्तिपीठचा नवा मार्ग सोलापूर, सांगलीतून जाणार : देवेंद्र फडणवीस  नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असतानाच राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला असून, नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

shaktipith news : शक्तिपीठचा नवा मार्ग सोलापूर, सांगलीतून जाणार : देवेंद्र फडणवीस

पुढे बोलताना ते म्हणाले की, वेगळी नवीन अलाइनमेंट ही चंदगडपासून सोलापूर, सांगलीपासून जाते, आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते, शक्तीपीठ मार्गातून आता त्यांच्याजवळ महामार्गाने पोहोचता येईल, आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग करा, याचा मोठा फायदा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे, पंढरपूरजवळून तो मार्ग जाईल आधी जॉईंट मेजरमेंट केले आहे, त्याचं संपादन आपण चालू केलेले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना सांगितलं की, नागपूर गोवा द्रुतगती मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. त्याचं नाव जरी नागपूर-गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल, आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेप लोकांचे आले होते.

विशेषत: लोकांचा एक आक्षेप होता तो खरा होता की, आपण जी अलाइनमेंट फॉलो केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली. सोलापूरपासून आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर जात होती, आणि त्याच्यामुळे ग्रीनफिल्ड महामार्ग का बनवतो कारण यामुळे नवीन एरिया ओपन होतात, ग्रीन फील्ड महामार्गामुळे न जोडले गेलेले लोक त्याला जोडले जातातआणि तिथे विकास होतो, म्हणून जयकुमार गोरे आणि सर्वांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूर पासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

शक्तिपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरणार आहे. मात्र, धाराशीवमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही.

त्यामुळे शक्तिपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर आणि सांगली जिह्यांमधून नेण्यात येईल, ज्यामुळे या दोन्ही जिह्यांचा शक्तिपीठाशी थेट संपर्क प्रस्थापित होईल, असे फडणवीसांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *