congress : काँग्रेसची पहिली यादी गुरूवारी रात्री जाहीर होणार?

SHARE:

विद्यमान 30 आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

मुंबई :

congress : काँग्रेसची पहिली यादी गुरूवारी रात्री जाहीर होणार? : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार असलेल्या 30हून अधिक उमेदवारांच्या नावाची यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

congress : काँग्रेसची पहिली यादी गुरूवारी रात्री जाहीर होणार?

राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बैठक पार पडली. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहे त्यापैकी 30 हून अधिक नावांची घोषणा पहिल्या यादीत केली जाणार असल्याची माहिती आहे. गुरूवारी रात्री काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.

पुढील चार दिवसात जागावाटपावर अंतिम निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या तारखा मंगळवारी जाहीर झाल्या पण महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या जवळपास 240 आणि महाविकास आघाडीच्या 220 जागा निश्चित झाल्या आहेत. पुढच्या 2 ते 3 दिवसांत हे जागावाटपही होईल. तसंच महायुतीचे उरलेले 48 आणि महाविकास आघाडीमध्ये 68 जागांवर अजूनही पेच कायम आहे. मात्र 20 तारखेपर्यंत म्हणजेच पुढील चार दिवसांत हे जागावाटप पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

महाविकास आघाडीचे जागावाटप याच आठवड्यात जाहीर करून उमेदवारांच्या नावासंदर्भात सुद्धा महाविकास आघाडीतील पक्ष निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. जागावाटप जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वपूर्ण बैठका होणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा असलेल्या जवळपास 40 जागांवर पुन्हा एकदा बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. अधिकाधिक जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून पुढील दोन दिवसात प्रयत्न केला जाणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *