सांगली :
sangli crime news : सांगलीत तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खुनी हल्ला : हल्ल्यात तरुण गंभीर : रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कृत्य. : शहरातील नागराज कॉलनी येथे अज्ञात कारणातून एका तरुणास रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी धारदार शस्त्राने भोसकून खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यश उर्फ अक्षय परशुराम पाटील (वय 24 रा. चांदणी चौक, सांगली) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
sangli crime news : सांगलीत तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खुनी हल्ला : हल्ल्यात तरुण गंभीर : रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कृत्य.
सदरची घटना हि सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी परशुराम पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज तांदळे आणि धनराज राऊत (दोघे रा. दत्तनगर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेची गंहीर दाखल घेत उपअधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देत संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी अक्षय पाटील हा आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील चांदणी चौक परिसरात राहतो. संशयित सुरज तांदळे आणि धनराज राऊत हे दोघेजण अक्षय याचे मित्र आहेत. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नागराज कॉलनी येथील अथर्व अपार्टमेंट जवळ उभा होता. यावेळी संशयित दोघेजण त्याठिकाणी आले.
संशयितांमध्ये आणि अक्षय मध्ये वाद झाला. या वादातून संशयितांनी त्यांच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने पोटात भोसकून त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर जखमी अक्षय पाटील याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह शहर विभागाच्या उपअधीक्षका विमला एम यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित दोघांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली.
या प्रकरणी परशुराम पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या खुनी हल्ल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











