विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडी, कसबेडिग्रज, इनामधामणी, समडोळी आणि नांद्रे येथील येथील दोन तर नांद्रे येथील एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी मालक, ट्रॅक्टरसह डीजे ऑपरेटर असा एकूण ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दि. २३ सप्टेंबर रोजी नवव्या दिवशी आणि अकराव्या दिवशी दि. २४ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण केल्याचे उघड झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी मनोज वाघमोडे, सचिन कोळी, अक्षयकुमार माने, दीपक कदम, विजय घोलप, मुसा फकीर यांनी फिर्याद दिली आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीवेळी बुधवारी समडोळी येथील जय हो गृप मंडळाने शांती सागर चौक येथे मोठ्या आवाजात डॉल्बी लावला होता. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष नरसू नेमाण्णा चव्हाण (वय ५५) उपाध्यक्ष संतोष बाळासो पाटील (वय ३५) यांच्यासह पदाधिकारी प्रशांत रावसो देसाई, देवप्पा श्रीपाल देसाई, शीतल गोपाळ कोळी, चालक किरण अशोक राजोबा (सर्व रा. समडोळी), डॉल्बी मालक अभिजित तानाजी जाधव, ऑपरेटर ओंकार संजय अडागळे ( दोघे रा. सौदापूर जि. सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे वाल्मिकी चौक गणेशोत्सव मंडळ समडोळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद दिलीप कोळी, उपाध्यक्ष साहिल शफिक फकीर, पदाधिकारी नितेश बाबुराव मस्कर, तुषार मारुती कोळी, वाहन मालक व चालक अभिजित महादेव गवंडी, डॉल्बी मालक समीर नसिर मुल्ला (रा. आंधळी ता. पलूस) आणि ऑपरेटर ऋषिकेश प्रकाश कोळी (रा. कुंडल) यांच्यावर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मिरज तालुक्यातील नांद्रे येथील गंजीखाना येथे पोलिसांनी डॉल्बी लावण्यास मनाई केली असताना देखील डॉल्बी लावून धिंगाणा सुरु होता. पोलिसांनी त्यांना रोखले असता त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष बसवराज सदाशिव मसुडगी, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन शिवाप्पा सावळगी, पदाधिकारी शिवराज सदाशिव मसुडगी, काशिनाथ सिद्धाप्पा ईडी, मनू रुद्राप्पा यळगुती (सर्व रा. गंजीखाना, नांद्रे), प्रशांत रामचंद्र बंडगर (वय ३० रा. मौजे डिग्रज), सागर नागेश दळवाई आणि उमेश शिवाजी मदने (दोघे रा. नांद्रे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कावजी खोतवाडी येथील मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज हणमंतराव पाटील, उपाध्यक्ष ओंकार प्रताप निकम, पदाधिकारी प्रणव महादेव पाटील, वाहन मालक, चालक व डॉल्बी मालक प्रवीण राजकुमार कांबळे (रा. कांननवाडी), ऑपरेटर रोहन राजाराम कांबळे (रा. सुभाषनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इनामधामणी येथील श्रमण आदिनाथ मगदूम, सुशांत सुंदर भोसले, सुशांत सुंदर भोसले, शुभम आगळगावे, अविष्कार कांबळे, सुदर्शन शांतीनाथ मगदूम (सर्व रा. इनामधामणी), सुधीर विवेकानंर रिसीव (रा.कवलापूर), निहाल अब्दुल भिलवडे (वय २० रा. सावळी) तर कसबे डिग्रज येथील मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत यशवंत सायमोते, शुभम शिवाजी शेवाळे, ओंकार अशोक साठे, स्वप्नील राजेंद मगदूम, ओंकार विजय मगदूम, रहिमान रमजान मुल्ला, शुभम सुरेश बागणीकर, डॉल्बी ऑपरेटर संकेत प्रमोद मसूले, डॉल्बी मालक अभय दीपक मंडले (रा. कराड), चालक विशाल दत्तात्रय दळवी (सर्व रा. कसबेडिग्रज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











