dudhgaon news : चिकटटेपचा चटका, दुधगावच्या कारभार्यांना दिला झटका ” दुधगावात जणू एखाद्या वाऱ्याने शांत आकाशाला अचानक हलवून सोडावे, तशी एक घटना घडली… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी ग्रामपंचायतीच्या पुरोहितपणाने मात्र “चिकटटेप” लावून स्वतःच्याच प्रतिष्ठेला चिखल लावला! महामानवाच्या प्रतिमेवर टेप लावून त्याखाली दुसऱ्या महापुरुषाचा फोटो चिकटवण्याचा प्रकार उघड होताच गावात संतापाची ज्वाला धगधगू लागली.
dudhgaon news : चिकटटेपचा चटका, दुधगावच्या कारभार्यांना दिला झटका
दुधगाव : अहंकाराला आलेली किंमत… आणि महापुरुषांच्या सन्मानाने सजलेली प्रायश्चित्त यात्रा
महापुरुषांचा सन्मान हा दुधगावच्या लोकांसाठी देवधर्माइतका पवित्र.
त्यांच्या पूजनात झालेला हलगर्जीपणा लोकांच्या मनाला चटका लावून गेला. “या मातीत जन्मलेल्यांचा अपमान आम्ही गप्प बसून पाहणार नाही!” — असा घणाघाती आवाज आकाशात घुमला. आंबेडकरी संघटना, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला अक्षरशः धारेवर धरले.
लोकांच्या रोषाची तीव्रता पाहून शेवटी ग्रामपंचायतीला आंबेडकर चौकात पुनर्पूजन करावे लागले आणि संपूर्ण जनतेसमोर माफीही मागावी लागली.
मात्र इथेच कथा थांबली नाही…
विरोधक आणि आंदोलनकर्त्यांनी ठरवले — ही चूक फक्त क्षमायाचनेने धुतली जाणार नाही.
कारभाराचा अहंकार मोडायचा असेल तर प्रायश्चितही तितकेच भव्य असायला हवे!
सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या हातात थेट महापुरुषांचे फोटो देण्यात आले, आणि त्यांना घेऊन गावभर भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणुकीच्या प्रत्येक पावलात एक संदेश होता —
“महापुरुषांचा सन्मान कधीही डळमळणार नाही, आणि पुन्हा कोणी प्रयत्न केला तर हा गाव शांत बसणार नाही!”
दुधगावने त्या दिवशी एक अनोखा धडा शिकवला —
सत्तेची खुर्ची आज आहे, उद्या नाही…
पण महामानवांचा सन्मान हा शाश्वत, अढळ आणि लोकांच्या हृदयात कोरलेला आहे.
त्या “चिकटटेप”च्या एका तुकड्याने कारभाऱ्यांना आयुष्यभर पुरेल असा धडा शिकवला,
आणि गावाने दाखवून दिले —
सन्मान जपणे हीच खरी लोकशाही, आणि जनतेचा आवाज हा कोणत्याही कारभारापेक्षा मोठा!
Author: अमोल कुदळे, दुधगाव
अमोल कुदळे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. तरुण भारत मध्ये तें सध्या असून राजकीय लाईव्ह साठीही लिखाण करतात.











