sangli news : राष्ट्रवादीला 30 जागा द्या अन्यथा स्वबळावर : पद्माकर जगदाळे : महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. पण राष्ट्रवादीला महायुतीमध्ये 30 जागा मिळाव्यात अन्यथा आम्ही स्वबळावर ताकदीने निवडणूक लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली.
sangli news : राष्ट्रवादीला 30 जागा द्या अन्यथा स्वबळावर : पद्माकर जगदाळे
ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत महायुती होईल, असे चित्र आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील भूमीका मांडत आहेत. महायुती अंतर्गत ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी पक्ष कमकुवत असेल त्या ठिकाणी दुसर्या मित्र पक्षाच्या उमेदवार लढवायला काहीच हरकत नाही. भाजपा कमकुवत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत असेल अशा जागांवर भाजप लढेल. ज्या जागेवर ज्यांची निवड येण्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारी मिळाली. महापालिकेत 2003 मध्ये घड्याळ या निवडणूक चिन्हावर महापालिकेत प्रथमच सत्ता परिवर्तन झाले होता.
2008 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने महापालिकेत आघाडी सत्तेत आली होती. तर 2013 नंतर पुन्हा अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर झाला होता. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तरी राष्ट्रवादीने 15 जागा यापूर्वी जिंकल्या आहेत, काँग्रेसच्या 10 जागा आम्हाला द्याव्यात कारण तिथला मतदार राष्ट्रवादीला साथ देणार आहे. सर्व पक्ष एकत्र बसून युती करू, त्यानंतर युतीचा अधिकृत निर्णय होईल. प्रत्येक प्रभागात आमची तयारी आहे, मात्र महायुतीलाच आमचे प्राधान्य असेल. 30 जागा न मिळाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने स्वबळावर निवडणूक लढू. भाजपच्या 41, मदनभाऊ गट 7, उर्वरित जागा आहेत.
त्यामुळे आमचे जागा वाटप होईल, जागा मागत असताना सक्षम उमेदवार आणि सर्व्हेक्षण याबाबत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असे वाटप होईल, निवडून येण्याची क्षमता हीच वाटपासाठी अट असेल. महायुतीसह सर्वच पक्षांनी मनपा निवडणुकीत अवैध धंदेवाल्यांना, गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये, असे आवाहन पद्माकर जगदाळे यांनी केले.
यावेळी मुन्ना कुरणे, जमील भगवान, विरेंद्र थोरात, राधिका हारगे, आकाश माने, ईश्वर जमखंडे, तोहीद शेख, सरफराज कच्ची, जयंत जाधव, तोहीद फकीर आदी उपस्थित होते.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही; दि. 12 पर्यंत इच्छुकांचे अर्ज
काही नगरपालिकांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. पण महापालिकेच्या निवडणुकीत तसे होणार नाही. महायुतीमार्फत लढू, सन्मानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केले. तर पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी दि. 12 डिसेंबरची मुदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











