jayant patil news : जळीतग्रस्त कुटुंबीयास आ. जयंतराव पाटील यांची भेट : हाकेच्या अंतरावर अग्निशामक दलाचे केंद्र असतानाही आमचा आयुष्यभर उभा केलेला प्रपंच जळाला. आम्हाला अग्निशामक दलाची वेळेवर मदत मिळाली असती, तर आमचा प्रपंच वाचला असता. आता आम्ही पूर्ण उघड्यावर आलो, या शब्दात इस्लामपूर येथील जळीतग्रस्त योगेश विलास सुर्यवंशी व त्यांच्या कुटुंबियांनी आपला आक्रोश माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्यासमोर मांडला.
jayant patil news : जळीतग्रस्त कुटुंबीयास आ. जयंतराव पाटील यांची भेट
आ.पाटील यांनी सुर्यवंशी कुटुंबियांना भेट देऊन जळालेले घर, संसारोपयोगी साहित्य, गॅरेज, वाहनांची पाहणी करून सुर्यवंशी कुटुंबाला धीर दिला. आ.पाटील यांनी भेट दिली त्यावेळी संपूर्ण सुर्यवंशी कुटुंबीय व त्यांचे काही नातेवाईक बेचीराख झालेले साहित्य बाहेर काढताना, काही वाचले आहे का? हे पहात होते. हे चित्र अतिशय विदारक होते. इस्लामपूर येथील योगेश सुर्यवंशी यांच्या गॅरेजच्या दारात उभा असलेल्या दुचाकी वाहनास आग लागली.
घर व गॅरेजच्या दारातील दुचाकी वाहनास अचानक आग कशी लागली? हेही कळत नसल्याची भावनाही कुटुंबियांनी मांडली. आ.पाटील यांनी सुर्यवंशी कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर त्यांनी मी संबंधित अधिकार्यांशी बोलून आपल्यासाठी काय करता येईल, ते बघू असा धीर दिला.
jayant-patil-news-a-jayantrao-patil-visits-the-burn-victims-family
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, सुभाषराव सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, माजी युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, परेश पाटील, प्रदीप थोरात यांच्यासह कार्यकर्ते व त्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











