sangli news : आईने दिले वीस वर्षाच्या मुलाला यकृत : दुर्मिळ आजारामुले नऊ वर्षांपासून आजारी असणार्या पोटच्या मुलाला मातेने यकृतदान करत पुन्हा नवे आयुष्य मिळवून दिले. मुंबई येथील सेंट्रल वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. आईचे यकृतदान, वडिलांची धडपड व डॉक्टरांनी केलेले मोठ्या प्रयत्नांमुळे विटा येथील रोहन पवार याला जीवनदान मिळाले.
sangli news : आईने दिले वीस वर्षाच्या मुलाला यकृत
रोहन पवारला मिळाले जीवनदान: आईचे कौतुक
वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील शर्मा यांनी या गुंतागुंतीच्या व महागड्या शस्त्रक्रियेबाबत सांगलीत पत्रकार बैठकीत माहिती दिली. ते म्हणाले, रोहन पवार याच्यावर सांगलीतील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तब्बेतील सुधारणा हात नसल्याने रोहनला पुढील उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात आले. या वेळी रोहनवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तात्काळ मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलशी संपर्क साधला.
डॉ.स्वप्निल शर्मा यांच्याशी संपर्क साधला सर्व टेस्ट पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासाठी यकृताचा शोध सुरू झाला. रोहनची आई सविता पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्या. आई सविता पवार यांचे यकृत मुलाला जीवनदान देणार असल्याचे स्पष्ट झाले.
सविता पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता यकृतदान करण्याचा निर्णय घेतला. या बाबतचा खर्च मोठा होता. त्यासाठी काही पातळीवरती मदत करण्याची तयारी हॉस्पिटल प्रशासनाने ही दाखवली. रोहनचे वडील रमेश पवार यांनी देखील शस्त्रक्रियेसाठी होकार दिला. त्यासाठी लागणार्या पैशाची जुळवाजुळव सुरू केली. हॉस्पिटलच्या माध्यमातून टाटा ट्रस्ट करून सुमारे 15 लाख रुपयांची मदत मिळवण्यात यश आले. इतर काही संस्था व देणगीदार यांच्याकडून मदत मिळवण्यात आली. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने रमेश पवार यांनी सोने-नाणे विकून शस्त्रक्रियेची तयारी केली.
सुमारे पंधरा दिवसाच्या शस्त्रक्रिया व उपचारानंतर रोहन ची प्रकृती पूर्वत होऊ लागली. रोहनला यकृत देणार्या आईचीही प्रकृती पूर्ववत होऊ लागली. वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाले.
रोहन पवार म्हणाला, ही संपूर्ण प्रक्रिया मला माहिती नव्हती. सुरुवातीला बरेच दिवस मला याबाबत काही सांगितले नव्हते. ज्यावेळी प्रत्यक्ष ऑपरेशनची वेळ आली त्यावेळी मला याबाबत माहिती देण्यात आली. बाकी खर्च व इतर सर्व माहिती ऑपरेशननंतर, माझी प्रकृती चांगली झाल्यानंतरच मला समजली. माझ्या आयुष्यावर माझ्या आईचे ऋण आहे. तिची खंबीरपणा आणि तिचे प्रेम यांच्यामुळे मला जगण्याची आणखी एक संधी मिळाली.
sangli-news-mother-donates-liver-to-20-year-old-son
मुलासाठी आईचा त्रास काहीच नसतो: सविता पवार
या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना रोहनची आई सविता पवार या भावनिक झाल्या. माझ्या मुलाला पुन्हा एकदा नव आयुष्य मिळाले. आजार दूर झाला याचे फार मोठे समाधान आहे. या सर्वांपुढे मला किती त्रास झाला, मी काय दिले याला फार महत्त्व नाही. मुलग्याची तब्बल उत्तम झाली यातच माझा आनंद असल्याचे सविता पवार यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











