jayant patil news : राजारामबापू कारखान्यातर्फे कुसुमताई ऊस उत्पादक प्रोत्साहन योजना

SHARE:

jayant patil news : राजारामबापू कारखान्यातर्फे कुसुमताई ऊस उत्पादक प्रोत्साहन योजना : कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद-बिगर सभासद शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले.

jayant patil news : राजारामबापू कारखान्यातर्फे कुसुमताई ऊस उत्पादक प्रोत्साहन योजना

एकूण रक्कम सात लाख रुपयांची बक्षिसे

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे व कारंदवाडी युनिटचा गळीत हंगाम मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते साखराळे युनिटमध्ये,तर संचालक वैभव वसंतराव रकटे यांच्या हस्ते कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर विधिवत पूजन करण्यात आले.

याप्रसंगी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे,संचालक बाळासाहेब पवार,विठ्ठल पाटील,कार्तिक पाटील,प्रदीपकुमार पाटील, अमरसिंह पाटील, अतुल पाटील,दादासाहेब मोरे,रघुनाथ जाधव, बबनराव थोटे,शैलेश पाटील,रमेश हाके, रामराव पाटील,हणमंत माळी,दिलीपराव देसाई,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, कामगार नेते राजेंद्र चव्हाण, तानाजीराव खराडे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिकदादा पाटील पुढे म्हणाले, आपण माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुसुमताई ऊस उत्पादक प्रोत्साहन योजना नव्याने सुरू केली आहे. कारखान्याच्या सहा गटासह कारंदवाडी गटासाठी प्रत्येकी 25 हजाराची चार बक्षिसे ठेवली आहेत.

जे ऊस उत्पादक सभासद-बिगर सभासद कारखान्या कडे आपला सर्व ऊस नोंद करून कारखान्या स घालतील त्यांना कारखान्याचे वतीने कुपन दिले जाणार आहे. हा गळीत हंगाम संपल्या नंतर 15 दिवसांनी ही सोडत केली जाणार आहे.

याप्रसंगी माजी संचालक विराज शिंदे,माजी जि.प. सदस्य संभाजी कचरे,प्रा.बाळासाहेब मासुले,कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख, विकास पवार,बाळासाहेब लाड,तानाजी कोळी,रावसाहेब मडके,शकील मुजावर, प्रकाश सावर्डे,साखराळेचे बाबुराव पाटील, भास्कर पाटील,वसंतराव माने,पी.बी.सुर्वे, जयसिंग डांगे,रामराजे पाटील,कारखान्याचे सचिव डी.एम. पाटील,जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,विजयराव मोरे, सुनिल सावंत,उमेश शेटे,संग्राम चव्हाण,महेश पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कामगार उपस्थित होते.

फोटो ओळी- साखराळे युनिट कार्यस्थळावर गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी कारखान्या चे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील,बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव,कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील, अमरसिंह पाटील,अतुल पाटील,प्रताप पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, कामगार नेते राजेंद्र चव्हाण,तानाजीराव खराडे,तसेच कारखान्याचे संचालक, अधिकारी,ऊस उत्पादक शेतकरी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *