nandani elephant news : महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी

SHARE:

nandani elephant news : महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी  एचपीसीने दिलेल्या आदेशानुसार गुजरात येथील वनतारा केंद्रात असलेल्या नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाच्या महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

nandani elephant news : महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी

याबाबत एचपीसीने 20 दिवसात वनतारा गुजरात येथे असलेल्या महादेवी हत्तीणीची आरोग्यस्थिती, तिचे सध्याचे वास्तव्य तसेच पुनर्वसन केंद्रातील सुविधा व वैद्यकीय तपासणी करावी. नांदणी येथे माधुरीसाठी उभारण्यात येणार्या पुनर्वसन केंद्राच्या सर्व आवश्यक परवानग्यांचा अहवाल तयार करून रेकॉर्डवर आणण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात एचपीसीचे डॉ. एन. एस. मनोहरण, मठाचे डॉ. एस. कल्लाप्पा, पेटाचे डॉ. निनीअरवींदन, वनताराचे निरज संगवान, नांदणी मठाचे माहुत ईस्माईल, डॉ. सागर पाटील, शिरीष हेरवाडे यांनी संयुक्तरित्या पाहणी केली.

हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करून याचा अहवाल संयुक्त पथकाने एचपीसीकडे सादर केला आहे. पुढील कार्यवाहीबाबतचा निर्णय 29 नोव्हेंबरच्या सुनावणीत होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *