zp election news : जिल्हा परिषद आरक्षण सोमवारी फायनल होणार अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध होणार

SHARE:

zp election news : जिल्हा परिषद आरक्षण सोमवारी फायनल होणार अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध होणार : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणाबाबत जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणावर सोमवारी (दि. 3) शिक्कामोर्तब होणार आहे. या आरक्षणवर आलेल्या 76 हरकतींबाबत निर्णय घेऊन अंतिम आरक्षण घोषणा विभागीय आयुक्त करतील, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी दिली.

zp election news : जिल्हा परिषद आरक्षण सोमवारी फायनल होणार अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध होणार

दरम्यान जिल्हा परिषद गट व गणनिहाय अंतिम मतदार यादीही सोमवारीच जाहीर होणार आहे. मतदार यादीबाबत 56 हरकती आल्या होत्या, संबंधित तालुक्यातील हरकतींवर तेथिल तहुसिलदारांनी निर्णय घेतलेले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. आतापर्यंतच्या नियोजनानुसार सर्व प्रथम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लागतील अशी चर्चा होती. त्यानंतर नगरपालिका व त्यानंतर महापालिका असा क्रम असणार असे बोलले जात आहे.

वास्तविक आक्टोंबर महिना अखेरीस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका लागतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अद्याप कोणत्याच निवडणूका जाहीर झालेल्या नाहीत. आचारसंहिताही लागलेली नाही.
आता नगरपालिका, नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे चर्चा सुरु झाली आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 गट असुन दहा तालुक्यांंमध्ये 122 पंचायत समिती गण आहेत. या सर्वांसाठी काही दिवसांपूर्वीच आरक्षण काढण्यात आले आहे. त्यावर हरकती दाखल झाल्या आहेत. आरक्षणाबाबत जिल्ह्यात एकुण 76 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक हरकती मिरज तालुक्यातील आहेत. त्याशिवाय तासगाव तालुक्यातीलही काही हरकती आहेत. या सर्वांबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेणार आहेत. या निर्णयासह सोमवार (दि. 3) नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीची मतदार यादीही अद्याप जाहीर झालेली नाही. त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. वाढीव मुदतही संपत असुन यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 3 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *