jayant patil news : इस्लामपुरात महादेवी हत्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निदर्शने

SHARE:

jayant patil news : इस्लामपुरात महादेवी हत्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निदर्शने : इस्लामपूर शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने श्री जीनसेन भट्टारक नांदणी मठातील महादेवी हत्तीण जामनगर (गुजरात) येथील वनतारा येथे नेल्याचा जाहीर निषेध येथील ऐतिहासिक कचेरी चौकात करण्यात आला. जवळपास 700 वर्षापासून धार्मिक विधीसाठी हत्ती सांभाळण्याची नांदणी मठाची परंपरा आहे. जैन समाजाच्या भावनांचा विचार करून तातडीने महादेवीला नांदणी मठाकडे सुपूर्द करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा महिला राष्ट्रवादी च्या प्रदेश सदस्या कमल पाटील यांनी दिला.

jayant patil news : इस्लामपुरात महादेवी हत्तीसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले,पेटा संस्थेने 2023 मध्ये मठास दिलेल्या भेटीनंतर महादेवीची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचा चुकीचा अहवाल देऊन न्यायालयाची दिशाभूल केली आहे. त्यातून हा प्रकार घडला आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रा.अरुणादेवी पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात,माजी शहर अध्यक्षा रोझा किणीकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकध्यक्ष विजयराव पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,माजी उप नगराध्यक्ष शंकरराव चव्हाण,सुनिल मलगुंडे, अनिल पावणे,शैलजा जाधव,प्रतिभा पाटील, मालन वाकळे,मनिषा पेठकर,सुनंदा साठे, सागर चव्हाण,शकील जमादार,विशाल सुर्यवंशी,अभिजित शिंदे,बाळासो कोळेकर, अभिमन्यू क्षिरसागर,मोहन भिंगार्डे,सुहास पाटील, सुहास हांडे,जुबेर खाटीक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *