karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेला 20.21 कोटीचा ढोबळ नफा भारती चोपडे

SHARE:

karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेला 20.21 कोटीचा ढोबळ नफा भारती चोपडे  कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 20 कोटी 21 लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. संस्थेच्या ठेवी, कर्जामध्ये उत्तम वाढ झाल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिली.

karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेला 20.21 कोटीचा ढोबळ नफा भारती चोपडे

अध्यक्षा चोपडे म्हणाल्या, आर्थिक वर्षात संस्थेने 2275 कोटीचा मिश्र व्यवसायाचा पुर्ण करुन उत्तम कामकाज केले आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी 1296 रुपये कोटी झाल्या आहेत. तर संस्थेने 980 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची अन्य बँकातील गुंतवणूक 505 कोटी अशी भक्कम आहे.

संस्थेचा स्वनिधी 154 कोटी रुपयाचा आहेत. आर्थिक वर्षाअखेर संस्थेचे खेळते भांडवल 1580 कोटी रुपयाचे आहे.
संस्थेची सभासद संख्या 69727 इतकी असून संस्थेकडे 59 कोटी रुपयाचे भागभांडवल जमा आहे. ढोबळ नफयातून 4 कोटी रुपयाच्या विविध तरतुदी करण्यात आल्या. तरतुदीनंतर संस्थेकडे 16 कोटी 21 लाखाचा निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. निव्वळ नफयातून निधीसाठी विविध तरतूद होवून संस्थेचा स्वनिधी भक्कम होईल.

सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी चांगले सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन, संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक यांचे चांगले योगदान मिळाले त्यामुळे संस्थेच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करता आल्याचे अध्यक्षा चोपडे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. एस.पी. मगदूम यांच्यासह संचालक मंडळ सदस्य आणि सेवक उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *