wategaon news : वाटेगावात कौटुंबिक वादातून पित्यानेच मुलाचा केला खून

SHARE:

wategaon news : वाटेगावात कौटुंबिक वादातून पित्यानेच मुलाचा केला खून : वाटेगाव ता. वाळवा येथे एका 65 वर्षीय पित्याने आपल्या 31 वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज, रविवारी पहाटे घडली. सततच्या वादाला कंटाळून पित्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

wategaon news : वाटेगावात कौटुंबिक वादातून पित्यानेच मुलाचा केला खून

कासेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत निखिल अरुण यादव (वय 31) हा गेल्या दोन वर्षांपासून मनोरुग्ण होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. निखिल घरात वारंवार वादावादी करून घरातील सदस्यांना त्रास देत असे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास निखिलने त्याचे वडील अरुण यशवंत यादव यांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. या सततच्या त्रासाला कंटाळून अरुण यादव यांनी पहाटे 4 च्या सुमारास निखिल झोपेत असताना त्याच्या डोक्यात दगड मारला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत निखिलची आई सुप्रिया अरुण यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पिता अरुण यशवंत यादव याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील ईश्वरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 सततच्या त्रासाला कंटाळून डोक्यात दगड खालून खून

निखिल घरात वारंवार वादावादी करून घरातील सदस्यांना त्रास देत असे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास निखिलने त्याचे वडील अरुण यशवंत यादव यांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. या सततच्या त्रासाला कंटाळून अरुण यादव यांनी पहाटे 4 च्या सुमारास निखिल झोपेत असताना त्याच्या डोक्यात दगड मारला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *