sugar cane news : गणदेवीचा देशात सर्वाधिक 4,701 रुपये ऊस दर : गुजरातमधील श्री सहकारी खांड उद्योग गणदेवी या साखर कारखान्याने संपलेल्या 2025-26 च्या हंगामात 7 लाख 1 हजार टन ऊसाचे गाळप करीत 8 लाख 15 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4,701 रुपये असा सर्वोच्च दर जाहीर केला आहे. गेली दोन दशके या साखर कारखान्याने देशात सर्वोत्तम ऊसदर देण्याची परंपरा कायम राखली. इतकेच नव्हे, तर गुजरातमधील अन्य सहकारी साखर कारखानेही शेतकर्यांना उत्तम दर देतात. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची रिकव्हरी उत्तम असतानाही दर दिला जात नसल्याची शोकांतिका आहे.
sugar cane news : गणदेवीचा देशात सर्वाधिक 4,701 रुपये ऊस दर
सांगली, कोल्हापुरात रिकव्हरी जादा असताना दराला कात्री
देशातील साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. साखर कारखान्यांकडून अंतिम दर जाहीर केला जात आहे. गुजरातमधील गणदेवी या साखर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4,701 रुपये असा सर्वोच्च दर जाहीर केला आहे. गणदेवी कारखान्याची हंगामाची सरासरी 1163 टक्के रिकव्हरी आहे. गेली दोन दशके या साखर कारखान्याने देशात सर्वोत्तम ऊसदर देण्याची परंपरा कायम राखली आहे.
इतकेच नव्हे, तर गुजरात मधील इतरही सहकारी साखर कारखाने तेथील शेतकर्यांना असा उत्तम दर देत आले आहेत. दक्षिण महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाची 12.5 टक्केपेक्षा जास्त रिकव्हरी असतानाही सहकार सम्राटांच्या ताब्यातील व खाजगी कारखाने ऊसदर देण्यात मागे पडले आहेत. पुढारी बनलेल्या कारखानदारांकडून वर्षांनूवर्षे ही लूट चालू असल्याने शेतकर्यांच्या मनात त्यांच्याबाबत अविश्वास निर्माण झाला आहे.
गणदेवी साखर कारखान्याने तोडणी व वाहतूक खर्च 770 रुपये वजा जाता मार्च 2026 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला 3931 रुपये असा उच्च दर दिला आहे. तर फेब्रुवारीतील ऊसाला 3831, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये आलेल्या उसाला 3731 रुपये असा ऊस दर देण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात मात्र प्रतिटन 3500 रुपये देऊन कारखानदारानी शेतकर्यांची बोळवण केली आहे.
गुजरातमधील बारडोली साखर कारखान्याने 3672 ते 3872, कामरेज येथील कारखान्याने 3725 ते 3925 सायन कारखान्याने 3676 ते 3831, मढी कारखान्याने 3512 ते 3612, चलठान कारखान्याने 3406 ते 3506 व महुआ कारखान्याने 3101 ते 3301, नर्मदा साखर कारखान्याने 3675 असा दर देण्याचे जाहीर केले आहे. ऊस दराबाबतची महाराष्ट्रातील परिस्थिती नेमकी उलटी असल्याचे स्पष्ट दिसते.
राज्यात कारखानदारांकडून वर्षानुवर्षे लूटच
राज्यातील सहकारी आणि खासगी कारखानदार हेच भाजपबरोबर सत्तेत आहेत. शेतकरी संघटना आणि शेतकर्यांनी तक्रार, आंदोलने करूनही कारखान्यांवर कारवाई केली जात नाही. राज्यात ऊसाची रिकव्हरी जास्त असतानाही सहकार सम्राटांच्या ताब्यातील व खाजगी कारखाने ऊसदर देण्यात मागे पडले आहेत.
कारखानदारांकडून वर्षांनुवर्षे ही लूट चालू असल्याने शेतकर्यांच्या मनात त्यांच्याबाबत अविश्वास निर्माण होत असल्याची टीका शरद जोशी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











