sangli ncp news : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करा: निशिकांत पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात बळकट करण्यासाठी संघटनात्मक बांधणीला प्राधान्य द्यावे. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय, धोरणे जनतेपर्यंत पोहचवावीत, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसल-पाटील यांनी बैठकीत बोलताना केले.
sangli ncp news : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करा: निशिकांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारी व विविध सेलच्या पदाधिकार्यांची बैठक येथील खरे सांस्कृतिक भवन येथे पार पडली. यावेळी निशिकांतदादा भोसले-पाटील बोलत होते. प्रथम उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना अभिवादन करून बैठकीला सुरूवात झाली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष, माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. राजेंद्र देशमुख, महिला आघाडीच्या अध्यक्षा साधना कांबळे, कार्याध्यक्षा तैसिन आत्तार, युवकचे अध्यक्ष अनिल पाटील आदी उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्याने पक्षाची बांधणी करणे आवश्यक आहे. पक्षश्रेष्ठींकडून येणारे आदेश, पक्षीय काम, पक्षाची ध्येय धोरणे व पक्षाची शिस्त या चौकटीमध्ये राहून प्रत्येक पदाधिकार्याने पक्ष वाढीसाठी काम करावे. संघटनात्मक कामाला प्राधान्य देणार्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षाकडून निश्चितच सन्मान होईल, असे मत व्यक्त केले. तर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभा व बूथनिहाय मतदार यादी पुनर्निरीक्षण हे अभियान बूथ स्तरावर प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच जिल्ह्यातील सर्व सेलच्या अध्यक्षांनी विधानसभा, तालुका व शहरनिहाय बैठकींचे नियोजन करून स्थानिक कार्यकारणी लवकरात लवकर निश्चित करून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या तृतीय महिन्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ तालुकास्तरावर विविध सामाजिक व पक्षीय कार्यक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर मे 2026 मध्ये पन्हाळा येथे जिल्ह्यातील 2 हजार 482 बूथ अध्यक्षांचे एकदिवसीय पक्षीय प्रशिक्षण शिबीर घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आटपाडी तालुका अध्यक्षपदी शरद तुकाराम नांगरे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी आकाश रावसाहेब माळी यांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक पदवीधर सेलचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय पाटील यांनी केले.
यावेळी हर्षवर्धन देशमुख, निलेश येसुगडे, धैर्यशील मोरे, हणमंतराव कदम, शंकर गायकवाड, तम्मानगौडा रवी-पाटील, नरेंद्र दिक्षित, तात्यासाहेब नलवडे, जीवन पाटील, रणजीत माने, चिटणीस राजेश लोखंडे, दिपक मगदूम, आनंदराव पाटील, चंद्रकांत पाटील, सुरेखाताई जगताप , सारंग माने, कृष्णात मोकळे, पंकज दबडे, दिपाली लांब, प्रतिक धनावडे आदी उपस्थित होते. आभार सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी मानले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच जिल्हा दौर्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहे. विविध कामांची उद्घाटने आणि पक्षीय कार्याचा आढावा त्या घेणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा दौरा यशस्वी करण्यासाठी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन निशिकांत पाटील यांनी केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











