sangli market commiti news : त्रिभाजनप्रश्नी शासन, बाजार समितीला म्हणणे मांडणार : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकार विभागाकडून केलेल्या त्रिभाजनप्रश्नी शासन आणि बाजार समितीच्यावतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने प्रशासकांना म्हणणे मांडण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आले. याबाबतची पुढील सुनावणी 21 एप्रिलला होईल. याशिवाय ग्रामपंचायत, विकास सोसायट्या आणि शेतकरी संघटना यांनीही त्रिभाजनाविरोधात याचिका दाखल केली असून त्यांच्याकडून म्हणणे मांडले जाणार आहे.
sangli market commiti news : त्रिभाजनप्रश्नी शासन, बाजार समितीला म्हणणे मांडणार
सांगली बाजार समिती त्रिभाजनप्रश्नी 21 एप्रिलला पुढील सुनावणी
सांगली बाजार समितीचे विभाजन करुन सांगली, कवठेमहांकाळ आणि जत अशा तीन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यात नव्याने 65 बाजार समित्यांच्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. परंतु 6 एप्रिल रोजी सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आले. याविरोधात विद्यमान संचालकांसह शेतकरी संघटना, ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांनी कोल्हापूर खंडपीठात विभाजनाविरोधात याचिका दाखल केली आहे. याबाबत खंडपीठात सुनावणी घेण्यात आली.
त्रिभाजन केल्याप्रकरणी शासन आणि बाजार समितीने म्हणणे मांडण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समितीवर जिल्हा उपनिबंधक प्रशासक आहेत, त्यामुळे बाजार समितीच्यावतीने प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण म्हणणे मांडतील. याबाबतची पुढील 21 एप्रिलला होणार आहे.
याशिवाय शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील तसेच मिरज, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील ग्रामपंचायती तसेच विकास सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी दाखल केलेल्या यांच्या याचिकेबाबत सुनावणी प्रलंबित राहिली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











