sangli crime news : सरपंच पत्नीसोबत लाच घेणारा शिक्षक निलंबित होणार

SHARE:

sangli crime news : सरपंच पत्नीसोबत लाच घेणारा शिक्षक निलंबित होणार : सरपंच पत्नीच्या सोबतीने लाच घेणार्‍या प्राथमिक शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात येूणार आहे. लवकरच तसे आदेश निघतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली. दरम्यान लाच स्वीकारणार्‍या सरपंच शीतल पाटील यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट आहे.

sangli crime news : सरपंच पत्नीसोबत लाच घेणारा शिक्षक निलंबित होणार

शिक्षणाधिकार्‍यांनी अहवाल मागवला

बाळासाहेब आकाराम पाटील (रा. वाकुर्डे खुर्द, ता. शिराळा) असे शिक्षकाचे नाव आहे. सोमवारी (दि. 6) सायंकाळी पत्नी शीतल यांच्यासह त्याला 35 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करुन घेण्यासाठी व शासकीय कपाती परत करण्यासाठी त्यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.

तडजोडीअंती 35 हजार रुपयांवर व्यवहार ठरला. शिराळा तहसील कार्यालयासमोरील एका हाटेलच्या पोर्चमध्ये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली.

या कारवाईची माहिती शिराळा गटविकास अधिकार्‍यांनी व गटशिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेला दिली आहे. बाळासाहेब पाटील हा जाधववाडी (माधळगाव) येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले की, पाटील याच्यावरील कारवाईचा अहवाल मागवला आहे. त्याला 48 तासांची पोलिस कोठडी झाली असल्यास त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठवला जाईल.

त्यानंतर त्यांच्याकडून निलंबनाचे आदेश जारी होतील. दरम्यान, लाच स्वीकारणार्‍या सरपंच शीतल पाटील यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *