kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूसह तिघांवर गुन्हा : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज येथे चारित्र्याचा संशय घेवून वारंवार केलेल्या शारिरीक आणि मानसिक त्रासास कंटाळून प्रियांका प्रशांत वाणी (वय 29) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी पती प्रशांत मल्लाप्पा वाणी, सासू शांता मल्लाप्पा वाणी आणि सासरे मल्लाप्पा वाणी (सर्व रा. कसबेडिग्रज) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूसह तिघांवर गुन्हा
चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद
याबाबत शोभा शंकर दरीगौड (रा. अथणी रस्ता, अफजलपुर टक्के, विजापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत प्रियांका हिचा विवाह 2012 साली अथणी येथील प्रशांत वाणी याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी पती प्रशांत, सासू शांता आणि सासरे मल्लाप्पा या तिघांनी चारित्र्यावर संशय घेवून प्रियांकाचा छळ करण्यास प्रारंभ केला. तिला माहेरी जाण्यासही सासरकडील लोकांनी मज्जाव केला होता.
तसेच तिला वारंवार शारिरीक आणि मानसिक त्रास देण्यात येत होता. या त्रासास कंटाळून प्रियांका हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. विवाहिता प्रियांका हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील तिघांवर फिर्यादी शोभा दरीगौड यांनी दाखल केली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











