zp news : पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या 10 मार्चला निवडी

SHARE:

zp news : पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या 10 मार्चला निवडी: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतर अखेर दहा पंचायत समित्यांच्या सभापती निवडीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला. सभापती आणि उपसभापतींच्या निवडी 10 मार्च रोजी होणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विशेष सभा घेण्यास उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी राजकीय हालचालींना गती येणार असून इच्छुक मोर्चेबांधणी सरसावणार असल्याचे स्पष्ट झाले.

zp news : पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या 10 मार्चला निवडी

जिल्हाधिकार्‍यांकडून दहा अध्यासी अधिकार्‍यांची नियुक्ती, राजकीय हालचाली वाढणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका होऊन दोन आठवड्यांचा कालावधी ओळखला आहे मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडी रखडल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाने याबाबत निवडणुका झालेल्या बारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून 20 मार्चपूर्वी या निवडी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रथम पंचायत समिती सभापती निवडीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुका 9 फेब्रुवारी रोजी पार पडल्या होत्या. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसोबतच दहा पंचायत समित्यांचा समावेश होता. ग्रामविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी नवनियुक्त सदस्यांच्या बैठका 20 मार्चपूर्वी घेण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहे.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पंचायत समिती सभापतींच्या निवडी दहा मार्च रोजी विशेष सभा घेऊन यामध्ये सभापती आणि उपसभापती निवड करण्यात येणार आहेत. सभापतींच्या निवडी झाल्यानंतर आठवडाभरातच जिल्हा परिषद अध्यक्ष निवडही होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विशेष सभा कार्यक्रम जाहीर केला आहे. 10 मार्च रोजी उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते 12 दाखल करणे, दुपारी 12 ते 12:30 अर्ज छाननी, दुपारी 12:30 ते 1 अर्ज माघार घेणे आणि दुपारी 2 वाजता सभापती, उपसभापती निवडीची सभा होईल.
जिल्ह्यातील दहा पंचायत समितीमध्ये विविध पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.

यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी दोन ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला एका पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन करणार असून मिरजेत भाजप-शिवसेना सत्ता स्थापन करू शकते, अशी राजकीय स्थिती आहे.

ग्रामविकास विभागाकडून अध्यक्ष आणि सभापती निवडीबाबतचे पत्र आल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद मिळवण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

पंचायत समितीमधील सत्तेचे चित्र
तालुका – पक्ष
वाळवा – शरद पवार राष्ट्रवादी
क.महंकाळ – शरद पवार राष्ट्रवादी
पलूस – काँग्रेस
कडेगाव – काँग्रेस
खानापूर – शिवसेना
आटपाडी – शिवसेना
जत – भाजप
मिरज – भाजप-शिवसेना
तासगाव – अजित पवार राष्ट्रवादी
शिराळा – शरद पवार-अजित पवार राष्ट्रवादी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *