kasbe digraj news : कसबे डिग्रजच्या उपसरपंचपदी पैलवान विनोद जगदाळे यांची बिनविरोध निवड

SHARE:

kasbe digraj news : कसबे डिग्रजच्या उपसरपंचपदी पैलवान विनोद जगदाळे यांची बिनविरोध निवड :मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज या गावाच्या नूतन उपसरपंचपदी पैलवान विनोद जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच पद रिक्त झाल्यानंतर गावच्या एकमताने ही निवड झाली असून, यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

kasbe digraj news : कसबे डिग्रजच्या उपसरपंचपदी पैलवान विनोद जगदाळे यांची बिनविरोध निवड

गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नेते व सांगली मार्केट कमिटीचे संचालक आनंदराव भाऊ नलावडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, गावचे सरपंच रियाज तांबोळी तसेच ज्येष्ठ उद्योजक सुकुमार चौगुले सावकार, यांच्या हस्ते विनोद जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमात बोलताना विनोद जगदाळे यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले,
गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि ग्रामविकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन. ज्येष्ठांनी दिलेली ही संधी माझ्यासाठी अभिमानाची बाब असून, तिचे सोने करण्याचा माझा प्रयत्न असेल.

कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर संपूर्ण गावात विनोद जगदाळे यांच्या समर्थनार्थ जल्लोष करण्यात आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *