shantisagar sosayati : शांतीसागर को ऑप. क्रेडीट सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात

SHARE:

shantisagar sosayati : शांतीसागर को ऑप. क्रेडीट सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात: मिरज तालुक्यातील समडोळी येथील शांतीसागर को ऑप. क्रेडीट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील होते. यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, चेअरमन राजवर्धन पाटील व सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

shantisagar sosayati : शांतीसागर को ऑप. क्रेडीट सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात

स्वागत व प्रास्ताविक चेअरमन राजवर्धन पाटील यांनी केले. यावेळी सुरेश पाटील यांनी संस्थेचा आढावा मांडला. ते म्हणाले, आज आपण एका अशा सभेत एकत्र आलो आहोत, जी फक्त हिशोबांची मांडणी नाही, तर आपल्या विश्वासाची, सहकारभावाची आणि एकत्र प्रगती करण्याच्या संकल्पाची साक्ष आहे. शांतीसागर सोसायटी ही केवळ आर्थिक संस्था नाही, ती आपल्या मेहनतीचे, सचोटीचे आणि परस्पर सहकार्याचे मंदिर आहे. गेल्या वर्षात आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे आम्ही उल्लेखनीय कामगिरी केली –

ते म्हणाले, संस्थेचे भागभांडवल: 2 कोटी 10 लाख रुपये असून, ठेवी: तब्बल 72 कोटी रुपयांच्या आहेत.संस्थेने आजपर्यंत 62 कोटी रुपयांच कर्ज वाटपक ेले आहे. त्यापैकी कर्ज वसुली: 97% आहे. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना 15 टक्के आकर्षक आणि समाधानकारक लाभांश देण्यात येणार आहे. संस्थेला कायम ऑडिट वर्ग अ आहे.

शेवटी ते म्हणाले, आपण दिलेला प्रत्येक रुपया, आमच्याकडे ठेवलेला प्रत्येक विश्वास, आणि घेतलेले प्रत्येक कर्ज वेळेवर परत करण्याची शिस्त – हाच आमचा खरा भांडवल आहे. येणार्‍या काळात आणखी शाखा विस्तार करणार असून, महिला बचत गटांसाठी विशेष योजना, तरुण उद्योजकांसाठी प्रेरणा व वित्तपुरवठा, पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य आणि 100% डिजिटल आणि पारदर्शक व्यवहार यावर भर देणार आहे.

यावेळी सागर घोंगडे, श्र्रेणीक मगदूम, अजित भंडे, शशिकांत राजोबा, भालचंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. अमोल चिमाण्णा, दिलीप वग्याणी, बबन थोटे, सुदर्शन हेर्ले, शितल थोटे, संस्थेचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक सुनील पाटील यांनी आभार मानले. मँनेंजर पवन पाटील यांनी अहवाल वाचन केले.

किरण पाटील यांची निवड

समडोळी येथील प्रगतशील शेतकरी किरण रावसाहेब पाटील चिट्टे यांची यावेळी संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली. भालचंद्र पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *