kolhapur news : कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

SHARE:

kolhapur news : कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा : कोल्हापूर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांनी थाटामाटात शनिवारी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु रविवारी सकाळी त्यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचे समाजमाध्यमावर जाहीर केले आहे. त्यामुळे खासदार आणि आमदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

kolhapur news : कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

थाटामाटात अर्ज, पण दुसर्‍याच दिवशी माघार;

गेल्या विधानसभा निवडणुकीतही कृष्णराज महाडिक हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. तसे फलकही लागले होते. परंतु ते रिंगणात उतरले नाहीत. मात्र त्यांनी चार दिवसांपूर्वी नगरसेवकपदासाठीचा उमेदवारी अर्ज नेल्याने चर्चेला उधाण आले. अशातच अजूनही महायुतीचा निर्णय झालेला नसताना आणि भाजपचे तिकीट वाटप झालेले नसताना कृष्णराज यांनी त्यांचा अर्जही दाखल केला.

याबाबत पक्षीय पातळीवरून नापसंती व्यक्त करण्यात आल्याचे समजले. त्यामुळे रविवारी सकाळी तातडीने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे महाडिक यांना जाहीर करावे लागले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *