मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर आज जाहीर होणार यादी
sangli election news : भाजपची संभाव्य यादी आली समोर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने 78 जागांवर उमेदवारांची यादी तयार केली आहे. यापैकी सांगली व मिरजेतील प्रत्येकी एका प्रभागातील तीन उमेदवारांचा घोळ रात्री उशीरापर्यंत मिटला नव्हता. मात्र उर्वरित 18 प्रभागातील उमेदवारांची यादी तयार झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांना कात्री लावली आहे.
sangli election news : भाजपची संभाव्य यादी आली समोर
ही यादी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे अंतिम शिक्कामोतर्बसाठी जाणार आहे. सोमवारी दुपारपर्यंत सर्व उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक इच्छूक संख्या होती. त्यामुळे उमेदवारीचा प्रचंड घोळ निर्माण झाला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी अंतिम करण्यासाठी दोन दिवस बैठकीचा धडाका लावला होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या समर्थकांची नावे यादीत आल्याने आ. सुधीर गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली होती.
निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याने आ. गाडगीळ आक्रमक झाले होते. हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोर्टात पोहोचला. मुंबईतील बैठकीतही जोरदार वादावादी झाली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आ. गाडगीळांची समजूत काढली. चार ते पाच दिवसातील चर्चेच्या गुर्हाळानंतर अखेर भाजपने उमेदवारांच्या नावावर एकमत करण्यात आले. भाजपमधून अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाला आहे. यात माजी उपमहापौर युवराज बावडेकर, माजी गटनेते विनायक सिंहासने, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार, अप्सरा वायदंडे, सोनाली सगरे, सुनंदा राऊत, भारती दिगडे या माजी नगरसेवकांसह अमोल गवळी, रौनक शहा, विश्वजित पाटील, सुजित काटे, सुजित राऊत, आशा शिंदे, नितीन शिंदे, दरिबा बंडगर या दिग्गजांचाही उमेदवार यादी समावेश नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगली व मिरजेतील एका प्रभागात रात्री उशीरापर्यंत खलबते सुरू होते. मात्र याचा निर्णय रविवारी रात्रीपर्यंतच होणार आहे. सोमवारी ही यादी अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठविली जाणार आहे. ही मान्यता झाल्यानंतर एबी फॉर्मसहीत यादी सांगलीला येणार आहे. सोमवारी ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
संभाव्य उमेदवार असे-
ऋषीकेश सूर्यवंशी, पद्मश्री पाटील, रविंद्र सदामते (प्रभाग एक), प्रकाश ढंग, प्रदीप पाटील (प्रभाग दोन), संतोष पाटील, रोहिणी पाटील, अतुल माने, वर्षा सरगर (प्रभाग नऊ), जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, गीता पवार (प्रभाग दहा), मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे, सविता संतोष रुपनर (प्रभाग अकरा), धीरज सूर्यवंशी, संजय यमगर (प्रभाग बारा), विजय साळुंखे, अनिता हणमंत पवार, उदय बेलवलकर, मनिषा संदीप कुकडे (प्रभाग चौदा), उत्तम साखळकर, स्वाती शिंदे, प्रदीप उर्फ गजू बन्ने, (प्रभाग सोळा) प्रशांत पाटील, गीतांजली ढोपे-पाटील, लक्ष्मण नवलाई, मालन गडदे (प्रभाग सतरा), शैलेश पवार, वैशाली राजू गवळी, बिस्मिला शेख, गीता जगदाळे (प्रभाग अठरा) संजय कुलकर्णी, सविता मदने, अलका ऐवळे, किर्ती देशमुख (प्रभाग 19).
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











