kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात 304 सरपंचपद खुले : येणार्या पाच वर्षांतील जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले असून, 1026 पैकी 722 पदे आरक्षित असून, 304 सरपंचपदे ही खुली राहणार आहेत. जरी एकूण 608 सरपंचपदे खुली राहणार असली तरी त्यातील 304 पदे ही महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.
kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात 304 सरपंचपद खुले
कोल्हापूर जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित
सन 2025 ते 2030 या कालावधीत होणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हे सरपंच पद आरक्षण निश्चित झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले असून, शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुकानिहाय आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतची पत्रव्यवहाराची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच तालुका पातळीवरील सरपंचपद आरक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी अनुसूचित जातीसाठी 138 सरपंचपदे आरक्षित राहणार आहेत. यापैकी 69 पदे अनुसूचितच जातीच्या महिलांसाठी आरक्षित असतील. सात सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहतील. या सातपैकी चार पदे संबंधित संवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 273 पदे आरक्षित राहणार आहेत. त्यापैकी 137 पदे या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित 608 पदे जरी खुली असली तरी त्यातील निम्म्या म्हणजे 304 पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.
kolhapur-political-news-304-sarpanch-posts-open-in-kolhapur-district
ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता प्रत्येक गावातील सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष तालुका पातळीवर होणार्या आरक्षणाकडे लागून राहिले आहे. आपल्याला संधी मिळाली नाही तरी पत्नीला किंवा अन्य नातेवाइकांना मिळू शकेल असा आशावाद कार्यकर्ते बाळगून आहेत.
सरपंचपदाचे आरक्षण
एकूण ग्रामपंचायती 1026
अनुसूचित जातीसाठी 138 त्यातील 69 पदे महिलांसाठी
अनुसूचित जमातीसाठी सात सरपंचपदे, त्यातील चार महिलांसाठी
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 273 पदे, त्यातील 137 महिलांसाठी
खुली पदे 608, त्यातील 304 महिलांसाठी

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



