kupwad news : कुपवाडमध्ये कौटुंबिक वादातून मजुराचा खून पत्नीसह रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात : कुपवाड परिसरात एका मजुराचा धारधार शस्त्राने वर्मी घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. दगडू सुखदेव केंगार (वय 55 रा. अलंकार कॉलनी कुपवाड) असे मयत मजुराचे नाव आहे.चारित्र्याच्या संशयाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे. अश्विनी रमेश गायकवाड (वय 29 रा. अलंकार कॉलनी कुपवाड) यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दाखल केली.
kupwad news : कुपवाडमध्ये कौटुंबिक वादातून मजुराचा खून पत्नीसह रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात
याप्रकरणी पत्नी छबुताई दगडू केंगार (वय 40 रा. कापसे प्लॉट) व तिचा साथीदार रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख फारुख मकानदार (वय 30 रा. बुधगाव रोड कुपवाड) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत दगडू केंगार हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, त्याचे व पत्नीचे कोणत्यातरी कारणावरून दोघांचे वारंवार वाद होत होते. याच रागातून कंटाळून पत्नीने तिचा साथीदार सराईत गुन्हेगाराच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून संबंधित मजुराचा कोणत्यातरी धार धार शस्त्राने पाठीवर मांडीवर वर्मी घाव घालून खून केला. पती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडताच संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला. पोलिस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. कुपवाड पोलीस ठाण्याचे सपोनी आनंदराव घाडगे व पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
अधिक तपास पोलीस करीत आहेत. संशयित शाहरुख मकानदार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कुपवाड व संजयनगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दखल आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











