ladki bahin yojna : जिल्ह्यातील 7 लाख लाडक्या बहिणांना करावी लागणार ई-केवायसी

SHARE:

ladki bahin yojna : जिल्ह्यातील 7 लाख लाडक्या बहिणांना करावी लागणार ई-केवायसी :विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. जिल्ह्यात सध्या 7 लाख महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत आहे. वर्षभरापासून सुरु असलेल्या योजनेचा लाभ सुरुच ठेवण्यासाठी आता शासनाने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. लाडक्या बहिणींना येत्या दोन महिन्यात ई-केवायसी करावी लागेल, अन्यथा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ladki bahin yojna : जिल्ह्यातील 7 लाख लाडक्या बहिणांना करावी लागणार ई-केवायसी

प्रक्रियेसाठी दोन महिन्याची मुदत

राज्य सरकारने महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील 7 लाख 79 हजार महिलांनी अर्ज भरले होते. याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र झाले आहेत. अर्ज मंजूर झालेल्यांचे प्रत्येक महिन्याला हप्ता वर्ग केला जातो. जिल्ह्यातही आतापर्यंत पावणेसात लाखांवर महिलांच्या खात्यावर लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होत आहे. ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. सरकारकडून सातत्याने लाडकी बहिण योजनेबाबत बदल केले जात आहेत.

अपात्र महिलांची छानणीसह, अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जावून माहिती घेतली जात आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील 75 हजार अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. लाडक्या बहिणींची पडताळणी सुरु असताना आता महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

ladki-bahin-yojna-7-lakh-lovely-sisters-in-the-district-will-have-to-do-e-kyc

दोन महिन्यात ई-केवायसी पूर्ण करावी लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी हीींिीं://श्ररवरज्ञळलरहळप.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी दि. 18 सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *