ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे.
ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
राज्यातील काही भागात पूराची स्थिती निर्माण झाल्यामुळे, तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आलं नव्हतं. अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.
परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना श-घधउ प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे श-ज्ञूल करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.
या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप श-घधउ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











