sangli bibtya news : सांगलीत बिबट्या दिसल्याने खळबळ वनविभागाकडून शोध मोहीम; पायाच्या ठसे आढळले :वानलेसवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोरून काल माध्यरात्री बिबट्या फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी ही बाब वनविभाग आणि स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली. त्यांनी तत्काळ धाव घेत शोध मोहीम सुरू केली. कुंभारमळा परिसरासह अन्य काही भागात त्याच्या पायाचे ठसे मिळून आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, परिसरात घबराहट पसरली असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
sangli bibtya news : सांगलीत बिबट्या दिसल्याने खळबळ वनविभागाकडून शोध मोहीम; पायाच्या ठसे आढळले
घटनास्थळ व नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील भारती हॉस्पिटलच्या समोरील भागात काल मध्यरात्री बाराच्या सुमारास एक दामप्त्य दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी त्यांना बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यांनी गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी दक्षिण बाजूला झाडाझुडपात तो पळून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर वानलेसवाडीतील एका बंद इमारतीच्या परिसरातही त्याला काहींनी पाहिले होते. त्यानंतर वनविभागाला कळवण्यात आले.
पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली परंतू रात्री उशीरापर्यंत तो मिळून आला नाही. दरम्यान, आज सकाळी आणि सायंकाळीही वनविभागाच्या पथकाने शोध मोहीम राबवली. त्यानंतर कुंभारमळा परिसरातील शेतात त्याच्या पायाचे ठसे मिळून आले होते. तसेच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुर्व भागातील जंगलात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.
त्यामुळे त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. आजही तो मिळून आला नाही. बिबट्याच्या वावराची बातमी वार्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे धबराहटीचे वातावरण होते. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, बिबट्या दिसून आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान, शोधासाठी आज ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात आली होती.
उसातील बिबट्या…
गेल्या काही वर्षांपासून माणूस आणि बिबट्या असा संघर्ष सुरू आहे. हे बिबट्या ऊस तोडी सुरू झाल्यानंतर मानवीवस्ती दिसून येत असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. कारण, यांची पैदास ही उसातील असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे ऊस तोडीनंतर हे बिबट्या सैरभैर होतात. अन्नाच्या शोधासाठी ते मानवीवस्तीत शिरत असल्याचा निष्कर्ष लावला जात आहे
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











