madhuri news : माधुरी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टाची ‘पेटा’ला 25 हजारांचा दंड;

SHARE:

 

madhuri news : माधुरी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टाची ‘पेटा’ला 25 हजारांचा दंड; : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाच्या माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारामध्ये स्थलांतरित करण्याची मागणी ‘पेटा इंडिया’ संस्थेने केली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सदरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे माधुरी हत्तीण नांदणी मठातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

madhuri news : माधुरी हत्तीण प्रकरणी सुप्रीम कोर्टाची ‘पेटा’ला 25 हजारांचा दंड;

माधुरी नांदणी मठातच राहणार

याचिका फेटाळताना न्यायालयाने ‘पेटा’ला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच दंडाची ही रक्कम माधुरीच्या उपचारांसाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत.

माधुरी हत्तीणीला नांदणी मठातून पुन्हा वनतारामध्ये पाठवण्यात यावे, अशी मागणी ‘पेटा इंडियाने’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली होती. माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणल्यानंतर तिच्या राहण्यावर आणि तिला मिळणार्या वागणुकीवर ‘पेटा’ने प्रश्न उपस्थित केले होते. 11 आणि 12 सप्टेंबर रोजी माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच ढोल-ताशांचा आवाज आणि मोठ्या घोषणांमुळे तिला त्रास झाल्याचा दावा पेेटा इंडियाने केला होता.

माधुरी हत्तीणीला साखळदंडात बांधून ठेवल्यामुळे तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्याचा आरोपही संस्थेने केला होता. या परिस्थितीचा विचार करून माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारामध्ये स्थलांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

या याचिकेवरील सुनावणीसंदर्भात माहिती देताना नांदणी मठाचे वकील मनोज पाटील म्हणाले की, न्यायमूर्ती पारदीवाला आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. वनतारा, महाराष्ट्र सरकार आणि नांदणी मठाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. माधुरी हत्तीणीसंदर्भात आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पेटाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यानंतर न्यायालयाने पेटाची याचिका फेटाळून लावत दंडाची रक्कम माधुरीच्या उपचारांसाठी वापरण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे माधुरी हत्तीणी नांदणी मठातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निकालाची माहिती मिळताच नांदणी गावात आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी जोरदार आतषबाजी करून निर्णयाचे स्वागत केले.

माधुरीप्रेमींना न्याय मिळाला..
माधुरीसंदर्भात पेटाने सुप्रीम कोर्टात पुर्नयाचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आज पुन्हा एकदा माधुरीप्रेमींना सुखद वार्ता मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे माधुरी नांदणीमध्येच रहावी यासाठी सतत झटणार्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे.
स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *