mahendra chandale news : झोपडीतून उठलेला नायक – महेंद्र चंडाळेंची लोकसेवेची गाथा

SHARE:

दिनेशकुमार ऐतवडे….

mahendra chandale news : झोपडीतून उठलेला नायक – महेंद्र चंडाळेंची लोकसेवेची गाथा: कधी काळी झोपडीतील चिमणी तेलाच्या दिव्याखाली उजेड शोधणारा एक मुलगा… आणि आज हजारो माणसांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा नेता!हा प्रवास आहे महेंद्रभाऊ चंडाळे यांचा – एका सफाई कामगाराच्या पोटातून जन्मलेल्या, पण माणुसकीच्या हृदयातून उभ्या राहिलेल्या युगपुरुषाचा. महेंद्र भाऊंचा प्रवास हा केवळ संघर्षांचा नव्हता, तो होता ंवेदनशीलतेचा, सहनशीलतेचा, आणि सातत्याच्या ध्यासाचा प्रवास. गर्दीत उभा असलेला एक सामान्य चेहरा, पण डोळ्यांत झळकणारी असामान्य जिद्द तीच जिद्द आज हजारो गरजू, उपेक्षित आणि दुर्लक्षितांना दिशा दाखवते आहे.

mahendra chandale news : झोपडीतून उठलेला नायक – महेंद्र चंडाळेंची लोकसेवेची गाथा

आज सांगली शहर एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस साजरा करत आहे – महेंद्रभाऊ चंडाळे. हा वाढदिवस केवळ केक कापून, फुगे फुगवून वा फोटोसेशन करून साजरा केला जाणारा दिवस नाही. हा दिवस आहे लोकसेवेच्या एका नव्या पर्वाची सुरुवात करणारा. आज महेंद्र भाऊ त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ स्वतःच्या आनंदासाठी नव्हे, तर शहरातील गोरगरीब, वंचित, आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिवशी तब्बल 51 शाखांचे उद्घाटन करून त्यांच्या सेवाभावाला एक नवा वळण देणार आहेत. याच उपक्रमातून त्यांच्या मनातील माणुसकीची, बांधिलकीची आणि समाजासाठी वाहून घेण्याची भावना प्रकट होते.

कष्टकर्‍यांच्या कुशीतून उगवलेले स्वप्न

महेंद्र भाऊंचा प्रवास सुरु होतो तो एका साध्या, गरिब घरातून – एका सफाई कामगाराच्या कुटुंबातून. लहानशा झोपडीतून उगवलेलं हे स्वप्न आज सांगली जिल्ह्यातील राजकारणात एक प्रभावी नाव बनलं आहे. शिक्षण अपूर्ण राहिलं, पण शिक्षणाची जागा घेतली ती अनुभवाने, संघर्षाने, आणि लोकांच्या प्रेमाने.
बालवयातच त्यांनी महापालिकेत सफाई कर्मचार्‍याची नोकरी स्वीकारली. पण ही नोकरी त्यांचं अंतिम ध्येय नव्हती – ती होती एक सुरुवात. एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाची.
भाऊ – एक नातं, एक आधार महेंद्र भाऊंची खरी ओळख त्यांचा लोकांशी असलेला अतूट भावनिक संवाद आहे. त्यांचं प्रत्येक वागणं, बोलणं, हसणं, रागावणं – सर्व काही समाजासाठी असतं. कोणाचं घर जळालं, कोणाच्या घरात आजारपण आलं, कोणाचं शिक्षण थांबलं – कुठल्याही संकटात भाऊ म्हणून धावून जाणारा माणूस म्हणजे महेंद्र चंडाळे.
त्यांचं नातं मतदारांशी नसून माणसांशी आहे – हृदयाशी आहे. म्हणूनच त्यांच्या मित्रपरिवारात पद, जात, पक्ष किंवा वयाचा अडसर नसतो. कारण प्रत्येकाच्या मनात महेंद्र भाऊ म्हणजे एक विश्वासाचं दुसरं नाव आहे.

अन्यायाविरुद्ध लढा :

जेलमध्ये गेलेला योद्धा एक काळ असा आला की, महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि काही नामवंत राजकीय मंडळींनी त्यांच्यासारख्या अनेक कुटुंबांचं घर बळकावण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. राजकीय पाठबळ नसताना, कोणतीही सत्ता नसताना, महेंद्र भाऊंनी या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस केलं.
हे धाडस त्यांना तुरुंगात घेऊन गेलं, पण त्यांनी तिथेही हार मानली नाही. तुरुंगात उपोषण करत, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करत त्यांनी समाजाला दाखवून दिलं की, सत्ता नसली तरी सत्याच्या बळावर अन्यायाला हरवता येतं. या लढ्यामुळे केवळ त्यांचं घर नव्हे, तर शेकडो कुटुंबांचं भविष्य वाचलं.

संघर्षातून सत्तेपर्यंत : महेंद्र भाऊंच्या राजकीय प्रवासाची भावस्पर्शी गाथा

जेव्हा महेंद्र भाऊंनी पाहिलं की, अन्यायाशी लढताना शस्त्रं केवळ हातात नसून हृदयातही असावी लागतात,
तेव्हा त्यांनी घेतला एक धगधगता निर्णय – जर आपला लढा राजकीय पहिलवानां विरुद्ध आहे,
तर आपणही राजकारणाच्या आखाड्यात उतरलंच पाहिजे! हा निर्णय त्यांच्या स्वार्थासाठी नव्हता, पदासाठी नव्हता, सत्ता मिळवण्यासाठी नव्हता – तर होता तो सत्याच्या आणि अन्यायाविरुद्धच्या अखंड झुंजीला अधिक बळ देण्यासाठी.

शिवसेनेची निवड : जिथे आवाजाला बळ मिळतं

महेंद्र भाऊंनी आपल्या जीवनाच्या या नव्या पर्वासाठी एक विचारपूर्वक निवड केली -शिवसेना! कारण ही संघटना म्हणजे सामान्य माणसाच्या आवाजाची भाषा. ही चळवळ म्हणजे झोपडपट्टीतील पोराला, श्रमिकाला, कष्टकर्‍याला, आणि उपेक्षितांना दिलासा देणारी सावली.
शिवसेनेच्या तत्त्वज्ञानाशी महेंद्र भाऊंच्या मनाचं सूर जुळला -जिथं विरोध करणं हे गुन्हा नव्हे, तर कर्तव्य मानलं जातं.
याच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सांगली शहरप्रमख म्हणून जबाबदारीची नवी धुरा स्वीकारली.

शहरप्रमुख : एका जबाबदारीचं, तळमळीचं आणि निष्ठेचं नाव

शहरप्रमुखपदी निवड होणं ही केवळ प्रतिष्ठेची बाब नव्हती,तर होती ती एक सामाजिक शपथ – की यापुढे कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज दाबला जाणार नाही. महेंद्र भाऊंनी या भूमिकेतून आपल्या कामाचा एक वेगळाच ध्यास घेतला. गोरगरिबांसाठी रात्रंदिवस झटणं, स्थानिक प्रश्नांना शासनाच्या कानापर्यंत पोहोचवणं,अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलने करणं -हे गळं त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं. त्यांच्या कामातील निष्ठा, तळमळ आणि लोकांप्रती सलेली बांधिलकी एवढी प्रभावी ठरली की, त्यांची दोन ते तीन वेळा फेरनिवड शहरप्रमुखपदी झाली.

mahendra-chandale-news-a-hero-who-rose-from-the-slums-mahendra-chandales-story-of-public-service

सत्ता नाही, तर सेवाभाव हाच पाया

महेंद्र भाऊंना सत्तेचा हव्यास नव्हता,त्यांना हवी होती ती जनतेच्या चेहर्‍यावरची समाधानाची एक चुणूक.त्यांनी पदाला प्रतिष्ठा दिली, पदावरून कधीच गर्व केला नाही. आजही सांगलीकरांच्या मनात भाऊ म्हणून त्यांची ओळख आहे,
कारण त्यांनी लोकांसाठी पद वापरलं – लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी नव्हे, तर त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी.

आजचा नेता – उद्याचा इतिहास

महेंद्र भाऊंचा हा प्रवास आता केवळ एका सफाई कामगाराचा संघर्ष न राहता, सामान्य माणसाच्या असामान्य यशाचं प्रतीक बनला आहे. आज ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पण त्यांच्या ओळखीचं मोल त्यांच्या पदावर नाही, तर त्यांच्या माणुसकीवर आहे. त्यांनी दाखवलेली धैर्याची वाट, सहनशीलतेचा मार्ग, आणि सेवाभावाची शिकवण हे आजच्या नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यांनी राजकारणाकडे सत्ता म्हणून नाही, तर सेवा म्हणून पाहिलं. म्हणूनच आज ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असले तरी, त्यांच्या ओळखीचं खरे
मोल त्यांच्या पदावर नाही – तर त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या लोकांच्या आयुष्यात आहे.

कृष्णामाईच्या ओटीचा नव्याने उजळलेला सोहळा

सांगली जिल्ह्याच्या मातीमध्ये संस्कृती, परंपरा आणि भक्तिभावाची अमूल्य शिदोरी खोलवर रुजलेली आहे. या मातीत दरवर्षी मिरजेला मिरासाहेब दर्ग्याचा उरूस साजरा होतो, कुपवाडमध्येही उरूसाचा उत्साह बघायला मिळतो. ही परंपरा हिंदू-मुस्लिम ऐक्याची, श्रद्धा आणि भक्तीची सजीव साक्ष आहे. आणि याच भूमीत, एकेकाळी पटवर्धन सरकारांच्याहस्ते कृष्णामाईचा एक लोभस, भावपूर्ण आणि जनमानसाच्या मनामनांत घट्ट रुतलेला उत्सव साजरा होत असे.
हा उत्सव एक अख्यायिका घेऊन येतो –

गंगेच्या निर्मळ, शांत आणि पावन प्रवाहाने आपल्या लाडक्या बहिणीकडे, कृष्णा नदीकडे भेटीला येण्याची ही गोष्ट आहे. पावसाळा संपला, निसर्ग आपलं सौंदर्य खुलवू लागला की, हा सोहळा दरवर्षी भक्तांच्या मनात नव्या उत्साहाने दरवळू लागायचा. मंदिरात दिव्यांची आरास, स्त्रियांच्या ओटीभरणीचा सोहळा, आणि त्या भक्तिभावाने भरलेल्या मिरवणुकीचा गजर… सगळं काही एक अलौकिक अनुभूती द्यायचं.

परंतु काळाच्या ओघात, बदलत्या सामाजिक रचनेत, हा उत्सव कुठेतरी हरवून गेला. मंदिराच्या दारात नजरेस पडणारी गर्दी विरून गेली, ओटीभरणीची पारंपरिक ओढ मंदावली, आणि एक सुंदर परंपरा काळाच्या धुळीत गडप झाली…
मात्र म्हणतात ना, ज्याचं हृदय श्रद्धेने आणि संस्कृतीच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेलं असतं, तोच पुन्हा काळाला मागे ओढतो आणि विस्मृतीत गेलेल्या परंपरांना नवजीवन देतो.

अशाच एका निस्वार्थ भक्ताच्या रूपात महेंद्र भाऊ पुढे आले. त्यांनी केवळ एक परंपरा नव्हे, तर एका जिल्ह्याच्या ओळखीला, इतिहासाला आणि अस्मितेला पुन्हा उजाळा दिला. त्यांनी कृष्णामाईच्या विस्मृतीत गेलेल्या उत्सवाला नवी दिशा, नवा श्वास दिला. त्यांच्या प्रयत्नांनी 81 हजार भाविकांनी पुढे येत भक्तिभावाने कृष्णामाईची ओटी भरली. हे केवळ एक धार्मिक कृत्य नव्हे, तर श्रद्धा आणि भावनेचा महासागर होता. त्या दिवशी मंदिराचा परिसर दीपमालिकांनी उजळून निघाला होता. स्त्रियांच्या केसांतून मोगर्‍याचा सुगंध दरवळत होता, पायातल्या पैंजणांनी संगीतमय लय पकडली होती, आणि प्रत्येक मुखातून जय कृष्णामाईचा जयघोष आसमंतात घुमत होता. थोर थोर मंडळीही या सोहळ्याला उपस्थित राहून आपला मानाचा मुजरा करत होती.

महेंद्र भाऊंचे हे कार्य म्हणजे एका हरवलेल्या पर्वाचं पुनरुज्जीवन आहे. त्यांच्या नावे आता केवळ सांगली नव्हे, तर संपूर्ण जिल्हा अभिमानाने बोलतो. भक्ती, श्रद्धा, आणि परंपरेची ही मशाल त्यांनी पुन्हा पेटवली, जी पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *