सरकारचा मोठा निर्णय; जरांगेची मागणी मान्य
maratha morcha news : सप्टेंबरपयर्ंतच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय .सप्टेंबर 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. याआधी मार्च 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती .
maratha morcha news : सप्टेंबरपयर्ंतच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार
आता या निर्णयामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील आंदोलनाच्या दरम्यान दाखल झालेले गुन्हेही मागे घेतले जाणार आहेत . आतापर्यंत 800 हून अधिक गुन्हे दाखल झाले असून त्यातील जवळपास 450 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत .मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनात ही एक महत्त्वाची मागणी होती .
मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने सरकारने घेतलेला निर्णय यांची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना दिले . त्यानुसार, आंदोलनावेळी 5 लाख रुपयांच्या खाली नुकसान झालेल्या मराठा आंदोलकांचे गुन्हा मागे घेण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता .
पाच लाखांच्या खालील जवळपास 400 ते 450 गुन्हे मराठा आंदोलकांवर दाखल आहेत .हे सगळे गुन्हे आता मागे घेतल्या जाणार असल्याने मराठा आंदोलकांना मोठा दिलासा मिळणार आहे .
maratha-morcha-news-cases-against-maratha-protesters-will-be-withdrawn-by-september
राज्य सरकारच्या मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला निर्णय यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आले .त्यानुसार मराठा आंदोलकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











