ration card news : आता रेशनवर मिळणार ज्वारी; बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

SHARE:

ration card news : आता रेशनवर मिळणार ज्वारी; बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश : राज्यात अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदा शासनाकडून रेशनवर गव्हाबरोबरच ज्वारीही मिळणार असून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 37,260 क्विंटल नियतन सातारा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना रुचकर चपातीबरोबरच पौष्टिक भाकरीची चवही घेता येणार आहे.

ration card news : आता रेशनवर मिळणार ज्वारी; बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

सातारा जिल्ह्यात अंत्योदय गटाचे 27 हजार 3 कार्डधारक आहेत, तर प्राधान्य गटाचे 16 लाख 86 हजार 924 लाभार्थी आहेत. यातील अंत्योदय लाभार्थ्यांना नियमितपणे प्रतिकार्ड 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ देण्यात येते, तर प्राधान्य गटात प्रति माणसी 2 किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येते. आता शासनाने यात बदल केला असून गव्हासोबत ज्वारीही देण्यात येणार आहे.

त्यानुसार अंत्योदय गटात प्रति कुटुंबांना गहू 8 किलो, ज्वारी 7 किलो आणि तांदूळ 20 किलो देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रति माणसी 1 किलो गहू, 1 किलो ज्वारी आणि 3 किलो तांदूळ असे वाटप होणार आहे. पोषणमूल्यांनी समृद्ध अशी ज्वारी आता थेट स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध होणार असून सातारा जिल्ह्यात प्रथमच असा निर्णय झाला आहे.
सातारा जिल्ह्यासाठी रेशनवर देण्याकरिता 37,260 क्विंटल ज्वारीची उचल जळगाव जिल्ह्यातील नांदुरा येथील गोदामातून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ration-card-news-now-sorghum-will-be-available-on-ration-twelve-districts-ordered-to-lift-grain

तीन दशकांपूर्वी ज्वारीचे दर कमी तर गहू महाग असायचा. त्यामुळे गरिबांच्या ताटात भाकरी असायची. मात्र, ज्वारीबाबत संशोधन होऊन आरोग्याचे फायदे समोर आल्यानंतर ज्वारीला मागणी वाढली. त्यामुळे हे भरडधान्य महागले. तथापि, सर्वसामान्यांनाही रेशनवर ही ज्वारी उपलब्ध होणार आहे.

योजना – गहू – तांदूळ – ज्वारी
अंत्योदय – 8 किलो प्रतिकार्ड – 20 किलो प्रतिकार्ड – 7 किलो प्रतिकार्ड
प्राधान्य कुटुंब – 1 प्रती व्यक्ती – 3 किलो प्रती व्यक्ती – 1 प्रति व्यक्ती

या बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश
जिल्हा – ज्वारी (क्विंटल)
नांदेड – 47460
परभणी – 28750
बीड – 36730
धाराशिव – 26020
अहिल्यानगर – 64860
लातूर – 39560
सोलापूर – 40260
सोलापूर एफडीओ – 10760
पुणे – 56880
पुणे एफडीओ – 27480
सातारा – 37260
सांगली – 39300

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *