nagarpalika news : जयसिंगपूर साठी 13 फेर्यांची प्रतीक्षा, मलकापूर पालिकेचा निकाल दुसर्याच फेरीत : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींमधील निवडणुकीचे निकाल रविवारी (21डिसेंबर) रोजी लागणार असून याकडे नगरवासीयांचे डोळे लागले आहेत. मलकापूर पालिकेचा निकाल अवघ्या दोन फेर्यांमध्ये जाहीर होणार आहे. तर जयसिंगपूर पालिकेसाठी सर्वाधिक 13 फेर्या पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.मतमोजणीसाठी 790 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे दोन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून तिसरे सुरू असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.
nagarpalika news : जयसिंगपूर साठी 13 फेर्यांची प्रतीक्षा, मलकापूर पालिकेचा निकाल दुसर्याच फेरीत
गडहिंग्लज मध्ये शनिवारी मतदान
गडहिंग्लज येथील प्रभाग क्रमांक 3 अ येथे निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी 2479 मतदारांसाठी 3 मतदान केंद्रांवर मतदान होईल.
अधिकारी दक्ष
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख नियोजनासह संबंधित राजकीय प्रतिनिधींना आवश्यक माहिती बैठकीतून देण्याच्या सूचना केल्या. निकालानंतर काढण्यात येणार्या विजयी मिरवणुकांबाबत कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे अमलात आणावी. कुठेही मिरवणुका, रॅली निघणार नाहीत याची दक्षता घ्या. सर्व ईव्हीएमची सुरक्षितता, सुरक्षा आणि स्ट्राँग रूमबाबत आवश्यक काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार, समन्स, वॉरंट आणि गुन्ह्यांबाबत माहिती दिली. कोल्हापूरसह इचलकरंजी नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली
अशी आहे यंत्रणा
सर्व 13 स्ट्राँग रूम ठिकाणी सशस्त्र दलाचे जवान, 3 आर्मगार्ड तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 8 पोलीस उपविभागीय अधिकारी, 12 पोलीस निरीक्षक, 55 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 463 पोलीस अंमलदार आणि 800 होमगार्ड नेमण्यात आले आहेत.
कोल्हापूरचे विशेष अभिनंदन
जिल्ह्यात एकूण 78.87 टक्के मतदानाची नोंद झाली. मुरगूड – 88.43,मलकापूर – 86.99 आणि वडगाव – 86.24 टक्के या नगरपरिषदा राज्यात टक्केवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत. मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी , पथकाचे विशेष अभिनंदन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आजच्या बैठकीत केले.
फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरसह इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक साहित्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











