तीसजणांवर गुन्हा दाखल : डॉल्बी जप्त
फाळकेवाडी ता. वाळवा येथे ज्योर्तिलिंग गणेश मंडळ व धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळ यांच्या कार्यकर्त्यात वाद होऊन झालेल्या राडा प्रकरणी डॉल्बी मालकासह तीसहुन अधिक जणांवर आष्टा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डॉल्बीही जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हेड कॉनस्टेबल दिपक राजाराम पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजणेच्या दरम्यान फाळकेवाडी गावातील हनुमान मंदीरा जवळील धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळ यांचे मंडळासमोर सार्वजनिक रोडवर जमावबंदीचा आदेश असतांना दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करुन एकमेकांचे अंगावर धावुन येऊन
सार्वजनिक शांततेचा भंग केला. या प्रकरणी ज्योर्तिलिंग गणेश मंडळाचे आरोपी अभिजित राजेंद्र आपुगडे, चेतन संभाजी आपुगडे, विक्रम मारुती आपुगडे, शुभम संदिप आपुगडे, नितिन बाळासो आपुगडे, शिवाजी वसंत आपुगडे, स्वप्निल शिवाजी आपुगडे, सुहास तानाजी आपुगडे, सागर सुरेश आपुगडे, धनाजी बाळासो आपुगडे तसेच ज्योर्तिलिंग गणेश मंडळाचे इतर अनोळखी 3 ते 4 इसम, सौरभ शिवाजी फाळके, सागर बाबासो फाळके, मनोज गोरखनाथ फाळके, प्रविण सदाशिव फाळके, प्रभाकर विश्वासराव फाळके, सुरेश बाबासाहेब फाळके, सचिन सदाशिव फाळके, रोहित गुलाबराव फाळके, धनराज गुलाब फाळके, विकास जयसिंग फाळके तसेच
धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळचे अनोळखी 03 ते 04 इसम सर्व रा. फाळकेवाडी ता वाळवा व डॉल्बी मालक शहाजी किसन पाटील रा. बिऊर ता. शिराळा याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











