सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी साऊंड सिस्टीम व लेझर लाईटच्या वापरास बंदी असतानाही मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकरणी शिवशक्ती मित्र मंडळ, समडोळी, सत्यप्रेमी मित्र मंडळ, प्रतिज्ञा मंडळ आणि नांद्रे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष संजय रामचंद्र कुंभार व डॉल्बी मालक रावसाहेब सुखराव गडदे (रा. विटा), तसेच सत्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष सौरभ मनोहर पाचोरे (रा. नांद्रे) आणि डॉल्बी मालक आरबाज जमादार (रा. माळवाडी, ता. पलूस) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
या प्रकरणी पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमितजीत देशमुख यांनी कारवाई केली.
गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण आणि नियमभंग रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











