raju shetti news : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 80 जणांची निर्दोष मुक्तता : ऊस दराच्या मुद्द्यावरून पुणे-बंगळुरू महामार्गावर सांगली नाका येथे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या खटल्याचा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात निकाल लागला. जिल्हा न्यायाधीश (2) डी. व्ही. कश्यप यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 80 आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली.
raju shetti news : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 80 जणांची निर्दोष मुक्तता
या निर्णयानंतर आंदोलकांनी न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला. तसेच आंदोलनाला पुन्हा बळ मिळाल्याची भावना शेट्टी यांनी व्यक्त केली.
ऊस दर आंदोलनादरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने एकूण तीन हजार 781 आंदलोकांवर गुन्हे दाखल झाले होते.
यात शिरोली नाका परिसरातील 80 आंदोलकांचा समावेश होता. या खटल्याचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश (2) कश्यप यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी आणि 80 आंदोलकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. संघटनेच्या वतीने अॅड. ब्रिजेश शास्त्री, अॅड. श्रेणिक पाटील, अॅड. अमेय मकरे, अॅड. सुवर्णभद्र पाटील, आदींनी कामकाज पाहिले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











