hsrt nambar p;ate news : एचएसआरपी नंबरप्लेटसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली : राज्य परिवहन विभागाने ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता वाहनचालकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून, या मुदतवाढीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
hsrt nambar p;ate news : एचएसआरपी नंबरप्लेटसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली
आता ही मुदतवाढ अंतिम असून, एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांकडून सांगण्यात आले.
राज्यात 2019 च्या पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक आहे. त्यामुळे पुण्यात 25 लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. मात्र, आतापर्यंत केवळ साडेसात लाख वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्यात आली आहे.
नंबरप्लेट बसविण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले असून, वाहनसंख्या आणि त्या तुलनेत एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी करून ती बसविण्यासाठी लागणारा कालावधी अधिक जात आहे. त्यामुळे एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याला मुदतवाढ मिळावी याबाबत सर्व स्तरांतून मागणी होत होती. त्यानुसार एक महिन्याची मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन आयुक्तांकडून देण्यात आली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











