raju shetti news : राजू शेट्टींना दे धक्का : स्वाभिमानीचे महेश खराडेंचा आज भाजपात प्रवेश : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे हे रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. याचबरोबर तालुक्यातील त्याचे अन्य कार्यकर्ते ही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
raju shetti news : राजू शेट्टींना दे धक्का : स्वाभिमानीचे महेश खराडेंचा आज भाजपात प्रवेश
तालुक्यातील दुष्काळमुक्त व्हावा. तालुक्यात पाणी योजना यावेत यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडून स्वाभिमानीत प्रवेश केला होता. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ऊस दर आंदोलन, शक्तिपीठ महामार्ग, शेतकर्याची अडकलेली ऊस बिले, दुष्काळ छावणी सुरू कराव्या असे अनेक आंदोलन केली आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हे ही दाखल करण्यात आले आहेत. पण अचानक ते आज भाजपात प्रवेश करणार असणारे अनेकाना धक्का मानला जातो आहे.
विधानसभा निवडणुकीत त्यांनी आ. रोहित पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करतील अशी चिन्हे होते. पण रोहित पाटील यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी आज भाजपा प्रवेश निश्चित केला आहे. यासाठी त्यांनी आ. गोपीचंद पडळकर याच्यासोबत संवाद साधुन हा प्रवेश निश्चित झाला आहे.
प्रवेशासाठी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष संग्राम महाडिक , तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील याच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











