sangli mahapalika news : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून ( शनिवारी) दोन दिवस सर्किट हाऊस शेजारी पाटीदार भवन येथे घेण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत.
sangli mahapalika news : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य निवडणूक प्रमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष तथा महापालिका निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे व जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या समितीमार्फत या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
प्रकाश ढंग म्हणाले, प्रभाग क्रमांक 1 ते 8 या प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत शनिवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 पासून पाटीदार भवन येथे घेण्यात येणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 8 ते 20 या प्रभागांच्या मुलाखती रविवारी (दि. 14 डिसेंबर) रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून घेण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी पाटीदार भवन येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
प्रत्येक प्रभागासाठी एक तासाचा कालावधी मिळणार आहे. या वेळेत संबंधित प्रभागातील सर्व इच्छुकांना आपली मुलाखत द्यावी लागणार आहे, त्यामुळे इच्छुकांनी वेळेत उपस्थिती रहावे, असे आवाहन शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











